नागपूर : राज्यात कोरोनाचा आकडा रोज वाढताना दिसत आहेत. नागपुरात आज 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे नागपुरातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता 72 वर जावून पोहोचली आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 6 जण शांतीनगर परिसरातले आहेत. तर 1 जण सतरंजीपुरा परिसरातील आहे. इतर दोघे मोमीनपुरा आणि कुंदनलाल गुप्ता नगरमधील आहेत.
आज ज्या 9 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्या सर्वांना आधीपासूनच आमदार निवास येथे क्वॉरंटाईन करण्यात आले होते. शांतीनगर परिसरातून मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्यामुळे आता शांतीनगर परिसरातील अनेक वस्त्या सील करण्यात आल्या आहेत. नागपुरात आजवर आढळलेल्या 72 कोरोना बाधितांपैकी आतापर्यंत 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच कोरोना रुग्णाच्या संपर्कात येऊन मोठ्या संख्येने संक्रमण होऊन नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.
नागपुरातील कोरोना हॉटस्पॉट
सतरंजीपुरा - याच भागातून सर्वाधिक कोरोना रुग्णाला समोर आले आहे. याच भागातील एका 68 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे.
शांतीनगर - शांतीनगर परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसात अनेक कोरोना रुग्ण समोर आले आहे.
मोमीनपुरा - 2 आठवड्यापूर्वी या भागातून कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर या परिसरात रुग्ण संख्या वाढली नव्हती. मात्र, आता नव्याने या भागात 1 रुग्ण वाढला आहे.
गिट्टीखदान - या भागातील काही वस्त्यांमधून ही तुरळक प्रमाणात कोरोना संक्रमित प्रकरण समोर आले आहे.
खामला - या भागातून सुरुवातीला अनेक कोरोना रुग्ण आढळले होते. मात्र, आता त्यापैकी बहुतांशी रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे. नव्याने या भागात रुग्ण आढळलेले नाहीत.
जरीपटका - या भागातून सुरुवातीला अनेक कोरोना रुग्ण आढळले होते. मात्र, आता त्यापैकी बहुतांशी रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. नव्याने या भागात रुग्ण आढळलेले नाहीत.