नागपूर: कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंगराव (PV Narasimha Rao statue) यांच्या पुतळा अनावरणाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या उपस्थितीत संस्कृत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ पार पडला. झाकलेल्या पी व्ही नरसिंहराव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाजूने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी निघून गेले. मात्र अपरिहार्य कारणाने या पुतळ्याच्या अनावरण होऊ शकले नाही. त्यामुळे घडलेल्या या नाट्यमय घडामोडींनी अनेक विवादांना जन्म दिला.
कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या परिसरात देशाचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंगराव यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमावरून जो विवाद सुरू आहे, त्यात आज एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. पी व्ही नरसिंगराव यांचा पूर्णाकृती तयार असलेला पुतळा हा कापडाने झाकून आहे व राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी त्याच्या बाजूने दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमात जात आहेत. ज्या पुतळ्याचे अनावरण काल होणार होते ते आजपण करता आले असते आणि राज्यपालाच्या शुभहस्ते करता आले असते. मात्र असे न केल्याने काँग्रेसने राज्यपालाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. राज्यपालांना काँग्रेस नेत्यांच्या पुतळ्यांचे अनावरण करायला अॅलर्जी असल्याचा आरोप करत पी व्ही नरसिंगराव हे देशाचे पंतप्रधान होते आणि पंतप्रधान हे कोणत्या एका पक्षाचे नसतात असा मुद्दा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधिमंडळात उपस्थित केला.
आज संस्कृत विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभ सुरु असतांना संस्कृतचे विद्वान पंडित असलेले माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंगराव यांचा पुतळा राजकीय वादामुळे झाकून असणे हे अनेक संस्कृत विद्वानांना पचणी पडले नाही. कारण ज्या श्रीकांत जिचकरांच्या पुढाकाराने हे संस्कृत विद्यापीठ उभे राहिले त्यात पी व्ही नरसिंगराव यांचे देखील अत्यंत मोलाचे योगदान होते. सुरवातीला 20 डिसेंबरला माजी आमदार गिरीश गांधी यांच्या हस्ते संस्कृत विद्यापीठात परिसरात पी व्ही नरसिंगराव यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार होते. मात्र काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधिमंडळात पहिल्याच दिवशी प्रश्न उपस्थित केला त्यामुळे विद्यापीठाने हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढक. त्यामुळे आज पी व्ही नरसिंगराव यांच्या पुतळ्यावर कापड झाकल्याचे पाहायला मिळाले
काँग्रेसने उपस्थित केलेले प्रश्न आणि त्यानंतर पुढे आलेल्या विवादानंतर विद्यापीठाने या वादावर पडदा टाकत पुतळ्याचे दानदाता नरसिंग राव यांचे पुत्र हे 20 डिसेंबरला समारंभात हजर राहू शकत नसल्याने अनिश्चित काळासाठी हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
हा विवाह वरवर बघता छोटासा वाटत असला तरी देशाचे माजी पंतप्रधान राहलेल्या विद्वान व्यक्तींना राजकीय चष्म्यातून बघणे आणि त्यानुसार एखाद्या राज्यपालांनी आपली भूमिका घेणे किंवा एखाद्या राजकीय पक्षाने आरोप-प्रत्यारोप करणे कितपत योग्य आहे हा प्रश्न या निमित्ताने निश्चितच उपस्थित झालेला आहे.