नागपूर : शहराचे कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा येथील चौदाशे नागरिकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकार, राज्य सरकार, नागपूर महानगर पालिकेसह आयसीएमआरला नोटिस जारी केली आहे. सतरंजीपुरा येथील 1 हजार 408 नागरिकांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या महानगरपालिकेच्या कृतीला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. छावणी परिसरातील रहिवाशी मोहम्मद निशात यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
सतरंजीपुरा येथील नागरिकांना सक्तीचे क्वॉरंटाईन करताना आयसीएमआर व आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशाचे पालन महापालिकेने केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. हाय रिस्क संपर्क व कोरोना पॉजिटीव्ह रूग्णांनाच 14 दिवस क्वॉरंटाईन करण्याचे निर्देश असताना महापालिकेने नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या 1 हजार 408 नागरिकांना क्वॉरंटाईन केले आहे. ज्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. ते हाय रिस्क संपर्कातील आहे की नाही हे तपासून पाहण्यात आले नसल्याचं याचिकेत म्हणण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे हनन होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
सकारात्मक! राज्यात आज 115 जण कोरोनामुक्त; आत्तापर्यंत 2 हजार 115 रुग्ण उपचारानंतर घरी
नागपूर खंडपीठाची नोटीस
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार विलगीकरण केंद्र हे शहराच्या बाहेर असणे आवश्यक आहे. परंतु, नागपूर शहरात तयार करण्यात आलेले विलगीकरण केंद्रे ही दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या भागात सुरु असून त्यामुळे इतरांना धोका उद्भवू शकतो, असंही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या याचिकेवर सुनावणी करताना नागपूर खंडपीठाने केंद्र सरकारचे विविध विभाग, राज्य सरकार, नागपूर जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना नोटीस जारी करीत दोन दिवसात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी पाच मे ला निश्चित करण्यात आली आहे.
नागपुरातून 1200 मजुरांना घेऊन विशेष 'श्रमिक' एक्स्प्रेस उत्तर प्रदेशला रवाना
राज्यात कोरोनाने 12 हजारांचा टप्पा ओलांडला
राज्यात आज कोरोनाच्या 678 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 12,974 झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दिलासादायक बाब म्हणजे आज 115 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आतापर्यंत एकूण 2115 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, आज दिवसभरात 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
Osmanabad Lockdown Effect | खेड्यापाड्यातील सलून चालकांवर उपासमारीची वेळ, बारा बलुतेदार काय करतायत? स्पेशल रिपोर्ट