नागपूरः मागील काही वर्षांत महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली, यामुळे प्रवेशासाठी जागाही उपलब्ध झाल्या आहेत. यासोबतच दरवर्षी वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षेतही विद्यार्थ्यांचा सहभाग बढतीवर आहे. सध्या शासकीय, महानगर पालिका, केंद्र सरकार व विना अनुदानित व स्वायत्त संस्थांमध्ये एमबीबीएस प्रथम वर्षाच्या 8,350 जागा उपलब्ध आहेत. तर यावेळी सुमारे 2.30 लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली. एकूण जागांमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील 4,280 जागा आहेत. या जागांची तुलना केल्यास सरकारी महाविद्यालयातील एका जागेसाठी सुमारे 50 विद्यार्थी प्रवेशासाठी दावेदार आहेत. एकंदरीत जागांचा विचार केल्यास सुमारे 30 विद्यार्थी प्रवेशाच्या रांगेत आहेत.
 
नीट परीक्षेनंतर विद्यार्थ्यांसह पालकांनाही निकालाची प्रतीक्षा आहे. निकालासोबतच प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. वर्षागणिक प्रवेशासाठी चुरस वाढली आहे. राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालांची संख्या 18 असूण त्यात 3,100 जागा उपलब्ध आहेत. तर महानगर पालिकांच्या 5 महाविद्यालयातय 880, केंद्राच्या 3 मेडिकल कॉलेजमध्ये 300 जागा आहेत. यात नीटच्या माध्यमातून प्रवेश होतात. यातील 85 टक्के जागा प्रादेशिक तर उरलेल्या 15 टक्के जागांचे प्रवेश आल इंडिया कोट्यातून होतात. 

खासगी महाविद्यालयाचे शुल्क अधिकच 

शासकीय संस्थांशिवाय 16 विना अनुदानित मेडिकल कॉलेजमध्ये 2,020 जागा आहेत. एक अल्पसंख्यांक मेडिकल कॉलेज असून येथे 100 जागा आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयात 50 टक्के जागा शासकीय कोट्यातून भरल्या जातील, तर उर्वरित जागा मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेशित होतील. या महाविद्यालयात खुल्या वर्गात एका वर्षाचे शुल्क सुमारे 10 लाख रुपये तर आरक्षित जागांसाठी 50 ट्क्के शुल्क आकारले जाते. याशिवाय राज्यात 10 अभिमत संस्था आहेत, येथे 1,950 जागा असून सर्व जागांवर मॅनेजमेंट कोटयातून प्रवेश दिले जातात. 

 

महाविद्यालयाचे प्रकार राज्यातील एकूण संख्या जागा उपलब्ध
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 18 3100
मनपाचे वैद्यकीय महाविद्यालय 5 800
केंद्र सरकारद्वारा संचालित संस्था 3 300
खासगी मेडिकल कॉलेज 16 2020
अल्पसंख्यांक कॉलेज 1 100
डीम्ड यूनिवर्सिटी 10 1950

RTMNU : नागपूर विद्यापीठाची प्रवेश पूर्व परीक्षा 11 ऑगस्टला


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI