नागपूर : जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयातील पाऊस आगमनानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. सद्य परिस्थितीत पावसाचा जोर वाढल्यामूळे बहुतांश ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली व शेतात पाणी साचले आहे. नागपूर जिल्ह्यातील टाकळी, वारंगा व चिकना या गावात तसेच भिवापूर तालुक्यातील तास या गावात सोयाबीन पिकाला खोड माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर किडीचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झाल्यामूळे सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सोयाबीनचे पिक सदयस्थितीत 25 ते 30 दिवसांचे आहे. तसेच या दरम्यान सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडीच्या प्रादुर्भावाची सुध्दा शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी बंधुनी जागरूक राहून किडींचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे.
किडीची ओळख व नुकसान
खोडमाशी लहान, चमकदार काळ्या रंगावी असुन त्यांची लांबी 2 मि.मि. असते. अंडयातुन निघालेली अळी पाय नसलेली, फिक्कट पिवळ्या रंगाची, 2-4 मि.मि. लांब असते. ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते. अळीनंतर पानाचे देठातुन झाडाचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरून खाते. प्रादूर्भावग्रस्त खोड चिरुन पाहिल्यास पांढूरक्या रंगाची अळी किंवा कोषला लसर नागमोडी भागात दिसते. खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाचे सुरुवातीचे अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते व मोठया प्रमाणात नुकसान होते. खोडमाशीची अळी तसेच कोष फांद्यात, खोडात असते. अशा किडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याचे वजन कमी होऊन उत्पादनात 16-30 टक्के घट होते.
Chandrashekhar Bawankule : पक्षाने तिकीट नकारलेले बावनकुळे आता 2024 मध्ये तिकीट वाटणार
पानाच्या देठावर अंडी
चक्रीभुंग्याची मादी पानाच्या देठावर, फांदीवर किंवा मुख्य खोडावर साधारणत: एकमेकांपासून 1 ते 1.5 से.मी. अंतरावर एकमेकास समांतर दोन गोल (चक्र) काप तयार करून त्यामध्ये अंडी टाकते. त्यामूळे चक्रकापाचा वरचा भाग सुकतो. अंडयातून निघालेली अळी पानाचे देठ आणि फांदीतून आत जाते, मुख्य खोडाचा भाग पोखरते. या किडीचा प्रादुर्भाव मुग, उडीद, चवळी या पिकावर सुध्दा होवू शकतो. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास झाडाची पाने, फांदया व मुख्य खोडाचा भाग वाळतो. पिक साधारणतः दिड महिन्याचे झाल्यावर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव असलेले झाड वाळत नाही, पण किड ग्रस्त झाडास कमी शेंगा लागतात परिणामी उत्पादनात घट येते.
RTMNU Exams : पावसामुळे 114 परीक्षा रद्द, 16 आणि 21 ऑगस्ट रोजी होणार पेपर
पिकांची अशी घ्या काळजी
पिवळे चिकट सापळे लावून नियमित खोडमाशीचा प्रादुर्भाव पाहणे (25 सापळे / हेक्टर). खोडमाशी व चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात अशी किडग्रस्त झाडे, पाने, फांदया यांच्या आतील किडीसह नायनाट करावा. यासाठी रासायनिक किटकनाशकांचा वापर करता येईल. खोडमाशी व चक्रीभुंग्याने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्या नंतर (सरासरी 10 टक्के किडग्रस्त झाडे) या दोन्ही किडींचे नियंत्रणासाठी इथियॉन 50 टक्के-30 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के- 6.7 मिली किंवा क्लोरेंट्रॅनिप्रोल 18.5 टक्के– 3.0 मिली किंवा थायोमेथोक्झाम 12.6 टक्के + ल सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेडसी 2.50 मिली यांपैकी कोणतेही एक किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.