नागपूर :  शहीद हेमंत करकरे (Hemant Karkare)  यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)  यांच्यावर नागपुरात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय. निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजय बोकाडे यांच्या तक्रारीवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजय बोकाडे यांच्या तक्रारीवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार  यांनी हेमंत करकरे यांच्या हत्याप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य करत हेमंत करकरे यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला होता.  तसेच त्यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक  संघ आणि भाजप यांच्या बद्दलही आरोप केले होते. त्यानंतर भाजपच्या विधी सेलने वडेट्टीवार असे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग करत असून समाजात  तेढ निर्माण करत आहे अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती.


अदखलपात्र गुन्ह्याची नोंद


याच तक्रारीच्या संदर्भात निवडणूक आयोगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडेट्टीवार यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


काय म्हणाले होते वडेट्टीवार?


हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी कसाबच्या किंवा कुठल्याही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती. ती गोळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या पिस्तुलमधील होती. त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. अशा देशद्रोह्याला भाजप तिकीट देत असेल तर मात्र भाजप देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले होते. कसाबला फाशी झाली म्हणजे श्रेय घेण्याचे गरज नाही. तालुका लेव्हलच्या बेलआऊट करणाऱ्या वकिलानेही हा खटला लढवला असता तरीही कसाबला फाशी झाली असती. कारण कसाब हा दहशतवादी होता. त्यामुळे त्याला फाशी झालीच असती. त्यामुळे यामध्ये उज्ज्वल निकम यांनी डिंग मारण्याचे किंवा बडेजाव मिरवण्याचे कारण नाही, असे विलासराव देशमुख यांनी म्हटले होते. विलासराव देशमुख यांनी उज्ज्वल निकम यांना तेव्हाच ओळखलं होतं, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजय बोकाडे यांच्या तक्रारीवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


हे ही वाचा :


Vijay Wadettiwar : एकनाथ शिंदे आणि अजित पवार पहिले अग्निवीर ठरतील पहिल्यांदाच म्हणालो होतो; विजय वडेट्टीवारांची खोचक टीका