Chandrasekhar Bawankule : हरियाणा आणि देशाने बघितलं आहे की कोणाचं पायगुण चांगला आहे. राहुल गांधी यांचा पायगुण चांगलं नाही. मोदीजी हे विश्व गौरव पुरुष असल्याचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केलं. योगायोगाने देशात विकासासाठी येणारे योगपुरुष म्हणजे मोदीजी असल्याचे बावनकुळे म्हणाले. यावेळी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर देखील बावनकुळेंनी टीका केली. काँग्रेसचा व महाविकास आघाडीचा जाहीरनामा हा अफवा असून त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. कारण काँग्रेस विकास करणार नाही असेही बावनकुळे म्हणाले. 


भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी भावनेच्या भरात किंवा उत्साहात चुकीची वक्तव्य करु नयेत


मल्लिकार्जुन खर्गे परवा लाडकी बहीण  विरोधात बोलले आणि काँग्रेसचे लोक लाडकी बहीण योजनेच्या विरोधात कोर्टातही गेले. मतांच्या भीतीपोटी त्यांनी पुन्हा हा खोटारडेपणा सूरु केला असल्याचे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले. खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या वक्तव्यावर देखील बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. असे बोलणे चुकीचे आहे. त्यांनी त्याबद्दल माफी मागितली आहे, मात्र, भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी भावनेच्या भरात किंवा उत्साहात असे वक्तव्य करू नये. त्यांनी त्या वक्तव्याचे खंडन करून माफी मागितली असल्याचे बावनकुळे म्हणाले. जितेंद्र आव्हाड स्टंटबाज आहेत, त्यांचा जास्त लोड घेऊ नका असेही बावनकुळे म्हणाले. 


आमचं बजेट तयार 


काँग्रेस लाडकी बहीण योजनेसाठी 3 हजार रुपये देणार आहे. काँग्रेसवाले खोटारडे आहेत, ही योजना बंद करावी म्हणून कोर्टात गेले आहेत. विजय वडेट्टीवारांसह अनेक नेते बोलले आम्हाला हे  परवडणार नाही आता ते योजना परत आणत आहेत असंही बावनकुळे म्हणाले. आमचं बजेट तयार आहे. रस्ते विज पाणी यासाठी केंद्राकडून पैसे आणू असेही बावनकुळे म्हणाले.


मनोज जरांगे यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही


मनोज जरांगे यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही. त्यांची सामाजिक मागणी आहे. जेव्हा जेंव्हा सरकार येईल तेव्हा त्यांचे प्रश्न पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची आहे असे बावनकुळे म्हणाले. शरद पवारांचा मोठा अनुभव आहे. त्यांच्याबद्दल मी टिप्पणी करणे योग्य नाही. मात्र, महाराष्ट्राची जनता आता महायुतीच्या बाजूने असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चंद्रशेखर बावनकुळे हे नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


महत्वाच्या बातम्या:


मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला