नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेलो पोहोचला आहे. भाजपा आणि काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात तळ ठोकला आहे. त्यामुळेच सध्या राज्यातील राजकारणा चांगलेच ढवळून निघालेले आहे. प्रचारसभांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. असे असतानाच भाजपाने नागपूरवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसचे नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांच्यावर केलेल्या टीकेतून त्याचीच प्रचिती येत आहे. नितीन राऊत हे ताजमहल मीच बांधला आहे, असं सांगतील, असा टोला फडणवीस यांनी लगावलाय.   


काम काहीच करत नाहीत, पण एक पत्र देतात आणि...


देवेंद्र फडणवीस काल उत्तर नागपूर मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या भाजपचे उमेदवार डॅा. मिलिंद माने यांच्या प्रचारसभेत बोलत होते.  एका प्रचारसभेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी नितीन राऊत यांच्यावर सडकून टीका केली. काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांची एक विशेषता आहे. काम काहीच करत नाहीत. पण एक पत्र देतात आणि म्हणतात हे काम मीच केलं आहे. ते तर बॅकडेटेडमध्ये पत्र देऊन ताजमहाल मीच बांधला असं सांगतील. ताजमहल बांधण्याची माझीच मागणी होती असं म्हणतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला.


नितीन राऊत मतदारांना भ्रमित करत आहेत


उत्तर नागपुरात बांधले जाणारे रुग्णालय मध्य नागपुरात सुरू केले, अशा पद्धतीची खोटी माहिती देत नितीन राऊत मतदारांना भ्रमित करत आहेत. उत्तर नागपुरात लवकरच सर्वात मोठे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


दरम्यान, भाजपाकडून ही निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न केले जात आहेत. भाजपाने आपल्या केंद्रातील नेत्यांना महाराष्ट्रात सभा घेण्यासाठी बोलवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात सभा होणार आहेत.   


हेही वाचा :


Video : शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय, लोकसभेतला पराभव, विधानसभेची संधी हुकल्यानंतर सुजय विखेंनी मन केलं मोकळं!


Devendra Fadnavis: मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही, जी जबाबदारी मिळेल ती पार पाडेन: देवेंद्र फडणवीस


अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका