Rohit Pawar on Aaditya Thackeray : खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shevale) कधी संसदेत बोलत नाहीत. काल बोलून त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा मांडण्याऐवजी मुंबईतील निवडणुका (BMC) डोळ्यापुढे ठेवून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर आरोप केले. मुंबईच्या निवडणुकीत बिहारी लोकांची मते मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचा विचार करुन असे खोटे आरोप होत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला.


भाजपचे नेते निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी असे प्रयत्न सुरुवातीपासून करत आहेत. यापूर्वी बिहारची निवडणूक असताना सुशातसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचे राजकारण करण्यात आले. गुजरात निवडणुका आल्या तेव्हा महाराष्ट्रातील प्रकल्प (Maharashtra Projects) पळवण्यात आले. कर्नाटक निवडणुका (karnataka election) येताच सीमावाद तापवण्यात येत आहे. तसाच प्रकार 'एयू' बाबत आहे. 


मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला की बोलू दिले जात नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे सभागृहात येत नाहीत, असे रोहित पवार म्हणाले. मोघम बोलून विषय टाळण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.


राहुल शेवाळे यांचे आरोप...


अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणावरुन शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने 44 कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितलं आहे, असा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केला. लोकसभेत बोलताना राहुल शेवाळे यांनी हा गंभीर आरोप केला.


शेवाळे यांच्या आरोपांवर आदित्य ठाकरे म्हणाले...


खासदार राहुल शेवाळे यांच्या आरोपांवर आदित्य ठाकरे प्रत्युत्तर दिलं. "Love You More" असे म्हणत "मला त्या घाणीत जायचे नाही. जे आपल्या घरातच निष्ठा ठेवत नाहीत अशा गद्दारांकडून काय अपेक्षा ठेवणार," असे सांगत आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप केले. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला भूखंड घोटाळा आणि राज्यपालांच्या वक्तव्यावरुन सुरू असलेला वाद अशा मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करता यावे यासाठी असले विषय काढून भलतीकडेच भरकटवले जात आहेत. आमचा आवाज दाबता यावा यासाठीच असले घाणेरडे आरोप केले जात आहेत."


ही बातमी देखील वाचा


महात्मा गांधी जुन्या काळातील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता; अमृता फडणवीस यांचं वक्तव्य