नागपूर : बहिणीला त्रास देणाऱ्या टवाळखोराला समज देत तिच्या मागे लागू नको, असे सांगितल्यामुळे त्या टवाळखोराने भावाची हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली आहे. धक्कादायक म्हणजे ही हत्या करण्यासाठी टवाळखोर आरोपीने त्या भावाला तुझ्या बहिणीचे काही व्हिडीओ दाखवायचे आहे असे सांगून कट करून शेतात एकटे बोलावले. नंतर त्याची हत्या करून दुचाकीला प्रेत बांधून दुचाकी विहिरीत ढकलून दिली होती. बंटी चिडाम असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे.


6 ऑक्टोबरच्या संध्याकाळी बंटी चिडामला एक फोन आला. फोन करणाऱ्या धीरज झलकेने तुला काही व्हिडीओ दाखवायचे आहे, असे सांगून बंटीला एकटेच शेतावर बोलावले होते. बंटीने ही बाब गावातील आपल्या नातेवाईकाला सांगितली होती. आधीच धीरजच्या कृत्याने त्रासलेल्या चिडाम कुटुंबाने बंटीला एकटा कुठेच जाऊ नको असे सांगितले होते. मात्र, बहिणीच्या अब्रूसाठी चिंतीत झालेला बंटी एकटाच गेला आणि त्याचा घात झाला.


किरकोळ कारणावरुन दोन भावात वाद, रागाच्या भरात छोट्या भावाकडून मोठ्या भावाची हत्या; सोलापुरातील धक्कादायक प्रकार


गावातून मिळालेल्या माहितीप्रमाणे गावातील ग्राम पंचायतीत छोटे मोठे काम करणारा धीरज झलके तापट स्वभावाचा होता, तो लहान मोठ्यांचा मान ठेवत नव्हता. धीरजने बंटी चिडामच्या चुलत बहिणीला मेसेज करणे सुरू केले होते. तिच बाब बंटीला माहीत झाल्यामुळे बंटीने धीरजला असे न करण्यास सांगितले होते. समजुतदारीने प्रकरण निवळण्यासाठी बंटीने धीरजच्या मोबाईल मधून बहिणीसह स्वतःच्या कुटुंबीयांचे नंबरही डिलीट केले होते. मात्र, तरीही धीरज ऐकायला तयार नव्हता. घटनेच्या दिवशी त्याने कट करून बंटीला एक व्हिडिओ दाखवतो असे सांगून शेतात एकटे बोलावले आणि त्याची हत्या केली.


पोलिसांनी आरोपी धीरजला अटक केली असून सध्या या प्रकरणात एकच आरोपी असल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, अॅक्टिव्हा सारख्या दुचाकीला मृतदेहासह रस्त्यावरून ओढत नेत विहिरीत ढकलणे एका व्यक्तीला शक्य नाही. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही आरोपी आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत.


सोशल मीडियावर मुलासोबत भांडल्यानंतर वडिलांची निर्घृण हत्या, नागपूर पोलिसांकडून तिघांना अटक