नागपूर :  रागाच्या भरात किंवा तणावात असताना आपण टोकाचे पाऊल उचलतो. मात्र त्यानंतर त्याचा पश्चाताप होतो. मात्र उशिर झाल्यावर त्याचा काही फायदा होत नाही असे नागपुरातील 22 वर्षीय युवकाच्या आत्महत्येवरुन पुन्हा अधोरेखित झाले. आपल्या मैत्रिणीसोबत फुटाळा येथे केकचे दुकान चालवणाऱ्या एका तरुणाने रामदासपेठ येथे विष प्राशन (young boy commits suicide) करुन आत्महत्या केली. विष प्राशन केल्यावर आपल्याला हे टोकाचे पाऊल उचलायचे नव्हते हे त्याला उमगले. त्याने आपल्या भावाला फोन करुन भावा मला वाचव मी विष प्राशन केले असल्याचे सांगितले. मात्र भाऊ पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.


रोहनसिंह जमशेदसिंह कपूर (वय 22, रा. रामनगर ) हे युवकाचे नाव असून तो फुटाळा परिसरात आपल्या मैत्रिणीसोबत केकचे दुकान (Cake Shop) चालवायचे. तसेच येणाऱ्या ऑर्डरची होम डिलिव्हरी करायचा. सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास रोहनने दुचाकीवर बसून रामदासपेठे (Ramdaspeth) येथील दुर्गा मंडप गाठवा. तेथे दुचाकी उभी करुन तो जमिनीवर बसला. त्याने एका व्यक्तीला भाऊ वीरपाल सिंह याचा मोबाइल क्रमांक देत फोन लावायला सांगितले. भाऊ मला वाचव, मला जगायचे आहे, मला मरायचे नाही, मी विष घेतले आहे, पण मला वाचव अशी विनवणी करु लागला. त्याचा भाऊ तातडीने तिथे पोहोचला. त्याने रोहनसिंहला दुचाकीच्या मागे बसविले त्यानंतर लता मंगेशकर हॉस्पिटल गाठले. यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


विकायचा ऑनलाईन फळ


केकचा व्यवसाय करण्यापूर्वी रोहन ऑनलाईन फळांची (Online Fruit selling) विक्री करायचा. त्यानंतर त्याने फुटाळ्याजवळ केकचे दुकान सुरु केले होते. दोघेही केकची होम डिलिव्हरी करायचे. रोहनच्या खिशातून विषारी पदार्थाच्या दोन पुड्या सापडल्या. त्याची प्रेयसी इन्स्टाग्रामवर काही पुरुषांना फॉलो करत असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. त्याने प्रेयसीमुळे रागाच्या भरात हे पाऊल उचलल्यांच बोललं जात आहे. यासंदर्भात दोघांमध्ये अनेकदा वाद झाल्याचेही सांगण्यात येत आहे. यासंदर्भात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करीत आहे. त्याने आर्थिक तंगीमुळे हे पाऊल उचलले आहे की दुसरे काही कारण आहे याचा पोलिस तपास करीत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Nagpur Navratri 2022 : नकोच! लाऊडस्पीकर अन् डीजे, रामदास पेठेतील गरब्यावर न्यायालयाचा निर्णय


मोदी सरकार न्यायाधीशांना ब्लॅकमेल करतं; ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचा गंभीर आरोप