भंडारा : भंडारा शहराला लागून असलेल्या वैनगंगा नदीत एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रियकर-प्रेयसीने आत्महत्येपूर्वी एकमेकांच्या हातात हात घालून ते ओढणीने बांधून घेतले होते.
दोघांजवळ सापडलेल्या मोबाईलच्या सहाय्याने त्यांची ओळख पटवण्यात आली. 22 वर्षीय विशाल गणेश शेंडे आणि 20 वर्षांची दीक्षा मारबते ही एकमेकांची मावस भावंडं होती. याच कारणामुळे त्यांच्या प्रेमसंबंधांना आणि लग्नाला घरच्यांचा विरोध असावा. त्यामुळेच या दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
दोघे भंडारा शहराजवळील जाव्हारानगरचे रहिवासी असून दोन दिवसांपूर्वी त्यांनी आयुष्य संपवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारधा गावात वैनगंगा नदीच्या तीरावर गावकऱ्यांना दोन मृतदेह पाण्यात तरंगताना दिसले. पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
ओढणीने हातात हात बांधले, नदीत उडी घेऊन प्रेमी युगुलाची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Nov 2018 08:11 AM (IST)
22 वर्षीय विशाल आणि 20 वर्षांची दीक्षा ही एकमेकांची मावस भावंडं होती. याच कारणामुळे त्यांच्या प्रेमसंबंधांना आणि लग्नाला घरच्यांचा विरोध असावा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -