Nagpur News : राज्यात सत्ता बदलाचे परिणाम दिसू लागले असून भाजप आमदारांच्या मतदारसंघात पैशाचा ओघ वाढू लागला आहे. दोन दिवसांपूर्वी कोट्यधीच्या पुरवण्या मागण्यांना विधानसभेत सादर करण्यात आल्या. या पुरवणी मागण्यात सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघांना (Constituencies of MLAs from the ruling party) झुकते माप दिल्याचे चित्र आहे. नागपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त तीनच विधानसभा मतदारसंघांना निधी देण्यात आला. यात दोन मतदार संघात भाजप (BJP) तर एका मतदारसंघात शिंदे गटाचे (Eknath Shinde Group MLA) आमदार आहे. 


राज्यात आता शिंदे सेना आणि भाजपचे सरकार आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे अर्थखाते आहे. ते नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा (Guardian Minister Nagpur District) आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्हा नियोजन समितीतून भाजप आमदारांच्या मतदारसंघात कमी निधी दिल्याची ओरड होती. सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्याच्या नियोजन आराखड्याला स्थगिती दिली होती. 


'या' आमदारांच्या मतदारसंघांना मिळाला निधी...


आता चालू वर्षांतील खर्चाला मंजुरी दिली आहे. मात्र अद्यापही मागील आर्थिक वर्षी मिळालेल्या निधीवरचे बंधन हटवण्यात आले नाहीत. त्यामुळे अन्याय झालेल्या जिल्ह्यांना नव्याने निधी देण्यात येणार असल्याचे समजते. हिवाळी अधिवेशनात 52 हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्यांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील कामठी, हिंगणा आणि रामटेक विधानसभा मतदारसंघांना सरासरी कोट्यवधींच्या निधीची कामे मंजूर करण्यात आली. परंतु इतर मतदारसंघात एकाही कामासाठी निधी देण्यात आल्या नसल्याचे समजते. मात्र हिंगणा विधानसभेचे आमदार समीर मेघे (Sameer Meghe) आणि कामठी टेकचंद सावरकर (Tekchand Sawarkar) हे दोन्ही भाजपचे आमदार (BJP MLA) आहेत. तर रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) आहेत. ते शिंदे गटाचे आहेत.


निधी अभावी रखडले दोन ऑक्सिजन प्लांट!


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांचे जीव गेले. भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अथवा इतरही वेळी ऑक्सिजनची कमतरता होऊ नये म्हणून जिल्ह्यात दोन ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारले जात आहे. परंतु, दोन्ही प्लांटचे काम थंडबस्त्यात असून साहित्यही धूळखात आहे. निधी अभावी हा प्लांट रखडला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. लोकांचा मृत्यू झाल्यावरच सरकार या प्लांटसाठी निधी देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.


ही बातमी देखील वाचा


काळजी घ्या! देशात 196 नवे कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांचा आकडा तीन हजार पार; भारतातील कोरोनाची परिस्थिती सविस्तर वाचा...