नागपूर: भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या पिढीला आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचे मोल काय आहे. तिरंगा डौलाने फडकणे म्हणजे काय? त्यासाठी केलेला त्याग व त्यामागचा इतिहास कळावा, यासाठी अमृत महोत्सवी वर्षांमध्ये 75 अधिकारी 75 शाळा असा संबोधन कार्यक्रम करणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत 'हर घर तिरंगा', 'स्वराज्य महोत्सव', यासंदर्भात आयोजित बैठकीमध्ये आज हा निर्णय घेण्यात आला. 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक घरावर तिरंगा डौलाने फडकणार आहे. त्यामुळे हा तिरंगा लावायचा कसा, यासोबतच हा तिरंगा घराघरावर लावण्याचे भाग्य प्राप्त कोणामुळे झाले, स्वातंत्र्याचा लढा काय होता, त्यासाठी कोणी बलिदान दिले, संविधानाचे महत्व अशा अनेक प्रश्नांना येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये पुढील काळात 'हर घर तिरंगा' संदर्भातील चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखविली जाईल तसेच सर्व अधिकारी एकच संदेश विद्यार्थ्यांना देणार असल्याचा निर्णय आज बैठकीत घेण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे समन्वय शिक्षणाधिकारी माध्यमिक रवींद्र काटोलकर व शिक्षणाधिकारी प्राथमिक रोहिणी कुंभार करणार आहेत.


1 ऑगस्टपासून ही मोहीम 


जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालयाने या संदर्भात तयार केलेल्या चित्रफितीचे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये प्रदर्शन होणार आहे. घरामध्ये तिरंगा उभारताना तो अतिशय सन्मानाने व ध्वज संहितेचे पालन करून उभारले गेला पाहिजे. यासाठी 1 ऑगस्टपासून ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, कमल किशोर फुटाणे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्यासह वेगवेगळ्या विभागाचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.


कुठे मिळेल तिरंगा



  • मनपाच्या सर्व झोन ऑफिसमध्ये

  • प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये

  • नगरपालिका, नगरपंचायत कार्यालयात

  • विद्यार्थ्याला शाळेचे मुख्याध्यापकाकडून

  • नागरिकांना नाममात्र शुल्क भरून घ्यावा लागेल


Nagpur Crime: अस्तित्वात नसलेल्या कंपनीची भागिदारी विकली, अमरावतीच्या महिलेने 6 लाख उकळले