Nagpur : मागील तीन वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना एसटीमध्ये नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काही पात्र उमदेवारांना आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर (Nagpur), भंडाऱ्यातील (Bhandara) पात्र उमेदवारांचाही समावेश आहे.


सुमारे तीन वर्षांपूर्वी निवड झालेल्या एसटी महामंडळातील (msrct) उमेदवारांना नियुक्तीपत्राची प्रतिक्षा होती. यासाठी अनेक मार्गांनी निवेदन आणि आंदोलन (Protest) करुन झाल्यावरही सरकारकडून नियुक्तीपत्र (Appointment Letter) देण्यास उदासिनता दाखवण्यात येत होती. यासंदर्भात माध्यमांनीही या उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक वृत्तमालिका चालवल्या. मात्र दीर्घ कालावधीनंतर या उमेदवारांच्या लढ्याला यश मिळताना दिसत आहे. अखेर नियुक्ती मिळत असल्याने उमेदवारही आशावादी झाला आहेत.


प्रक्रिया पूर्ण करुनही नियुक्तीपत्र नाही


राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) 2019 मध्ये चालक (Driver) आणि वाहक (Conductor) (कनिष्ठ) पदासाठी सरळसेवा भरती परीक्षा घेतली होती. लेखी परीक्षा, वाहन चालक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी, वैद्यकीय तपासणी, सेवा पूर्व प्रशिक्षण अशा सर्व पदभरतीचा टप्पा पार करत राज्यातील 2800 उमेदवार सेवेसाठी पात्र ठरले होते. यात नागपूर विभागाचे 190 उमेदवार होते. मात्र, जवळपास तीन वर्षे होऊनही नियुक्ती मिळाली नव्हती. नियुक्तीसाठी उमेदवारांनी उपोषण केले, निवेदने दिली.


अधिकाऱ्यांची नियुक्ती, कर्मचारी वाऱ्यावर


या दरम्यानच्या कालावधीत एसटीतील पात्र उमेदवारांच्या जगण्यासाठीचा सुरु असलेला संघर्ष (Struggle for life) अनेक माध्यमांनी समोर आणला होता. यामध्ये उमेदवारांच्या वेदनाही मांडण्यात आल्या. त्यानंतर उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसात प्रकरण मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, दोन महिने होऊनही निर्णय झाला नव्हता. दरम्यान उमेदवारही चिकाटीने न्यायाच्या प्रतिक्षेत होते. तसेच मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची पूर्तता केव्हा अशा प्रश्न विचारला जाऊ लागला. याच भरतीतील विभागीय वाहतूक अधीक्षक/आगार व्यवस्थापक (वाहतूक) वर्ग-2 (कनिष्ठ) यांना नियुक्ती देण्यात आली. मात्र, चालक तथा वाहक (कनिष्ठ) या पात्र उमेदवारांना नियुक्ती दिली नव्हती. तसेच अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन एसटी महामंडळाने काय साध्य केले. कर्मचाऱ्यांना कशामुळे डावलले जात आहे, असा प्रश्न विविध स्तरावर विचारला जाऊ लागला. यानंतर अखेर झोपलेल्या प्रशासनाला जाग आला असून या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, आम्ही तुम्हाला रिस्पॉन्स देणारे लोक... आता उपोषण सोडा


Nagpur ZP Elections : पुढील आठवड्यात जाहीर होणार झेडपीचा निवडणूक कार्यक्रम; अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड या तारखेला