Nagpur : मी मुख्यमंत्री असताना हा प्रश्‍न निर्माण झाला होता, त्यावेळी आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत भांडून तो सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दुर्दैवाने सरकार बदलले तरीही आम्ही या प्रकरणात लागूनच राहिलो आणि आताही या परिस्थितीतून मार्ग काढू, तुम्हा लोकांना सुरक्षित कसं करता येईल, याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. 


ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ व्ह्यूमनच्या वतीने (organization for rights of human) विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या राज्यस्तरीय उपोषण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी समस्या ऐकून घेत त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या विनंतीवरून उपोषण मागे घेण्यात आले. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून विकास कुंभारे या प्रश्‍नासाठी विधानसभेत भांडत होते. 


आम्ही तुमचे लोकं आहोत...काळजी करु नका


आता राज्यात सरकारमधील (State Government) आम्ही सर्व तुम्हाला रिस्पॉन्स देणारे लोकं आहोत. आम्ही तुमचे लोक आहोत. त्यामुळे तुमच्या समस्या सोडविण्याचे काम आम्ही निश्‍चितपणे करू. कारण आता नवीन सरकार आले आहे आणि तुमच्या समस्या नव्याने सोडवाव्या लागणार आहेत. त्यामुळे आपण हे उपोषण मागे घ्यावं, असे आवाहन फडणवीसांनी उपोषणकर्त्यांना केले. तुमच्या प्रश्‍नांसाठी लवकरच मुंबईत बैठक बोलावणार आहोत, त्या बैठकीला तुम्ही यावं, अशी विनंती तुम्हाला आहे. तुमचं आंदोलन हे फक्त नागपुरातच सुरू नाही, तर राज्यव्यापी आहे. त्यामुळे राज्यभरातील तुमच्या बांधवांना सांगून आंदोलन मागे घ्यावे. त्यांना सांगा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहेत. त्यामुळे उपोषण मागे घ्या आता निश्‍चितपणे आपल्या समस्यांवर मार्ग निघेल, असे त्यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले. 


'या' काळात विदर्भात प्रत्येक जिल्ह्यात हजारो हलबा बांधव होते


विदर्भातील (Vidarbha) 1881 व सन 1891 या काळात प्रत्येक जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने हलबा, हलबी (Halba, Halbi community) जमातीची लोकसंख्या होती. 135 वर्षांपूर्वी नागपुरात 40 हजार लोकसंख्या होती. त्यांनी पोटासाठी कोष्टी जातीचा व्यवसाय स्वीकारला. कोष्टी व्यवसाय समूहात हलबा जमातीची मातृभाषा हलबी हीच बोलीभाषा होती, हा इतिहास आहे. गोंडवाना प्रदेश हलबा जमातीची मूळ वस्ती आहे. सी.पी. अँड बेरार (cp and berar) भागातील हलबा आदिवासींचा इंग्रजांनी अभ्यास केला असून त्या इतिहासकारांना विदर्भात स्वातंत्र्यपूर्व काळात लाखोंच्या संख्येने हलबा जमातीची लोकसंख्या आढळली. विदर्भातील हलबा जमातीने पोटासाठी 'कोष्टी' व्यवसाय केला. ते हलबी या बोलीभाषेत बोलतात.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Nagpur ZP Elections : पुढील आठवड्यात जाहीर होणार झेडपीचा निवडणूक कार्यक्रम; अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड या तारखेला


Maoist On PFI Ban: पीएफआयवरील बंदी म्हणजे फॅसिस्ट हिंदुत्ववादी अजेंडा; माओवाद्यांची सरकारवर टीका