File Case Against Mahesh Manjrekar Demands Lahu Sena: 'काळे धंदे'या वेबसिरीजमध्ये दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी बँड वाजवणाऱ्यांबद्दल अपमानास्पद आणि अश्लील भाषेत बोलून बँड व्यवसाय करणाऱ्यांचा अपमान केला आहे. यामुळे बँड व्यवसाय करुन आपली आणि आपल्या परिवाराची उपजिविका भागविणाऱ्यांचा अपमानच असल्याचा आरोप करत महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नागपुरात लहू सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. 


लहू सेनेचे प्रमुख संजय कठाळे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी बनकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. झी (डी. जे. करम रिमिक्स) वरती 'काळे धंदे'या वेबसिरीजमध्ये दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि निर्माते यांनी एका लग्न समारंभात काही बँडवाले आतमध्ये मंडपात एसीच्या समोर हवा खात उभे असल्याचं दाखविण्यात आलेले आहे. त्याच वेळी समोरून महेश मांजरेकर आणि सहकारी येतात जाता मागे वळून उभे राहिलेल्या बँड वाल्यांना महेश मांजरेकर अपमानास्पद आणि अश्लील भाषेत बोलत असल्याचा प्रसंग चित्रीत केला गेला आहे.


खरं तर वेबसिरिज रिलीज करणं खासगी बाब असली, तरी ही अशा प्रकारचे चित्रीकरण करणं म्हणजे बँड व्यवसाय करून आपली आणि आपल्या कुटुंबियांची उपजिविका भागवणाऱ्या सर्व सामान्य गोरगरिब लोकांचा तो एक प्रकारे अपमानच आहे. अशा प्रकारच्या समाजामध्ये तेढे निर्माण करणाऱ्या आणि सर्वसामान्य लोकांना अपमानित करणाऱ्या, लज्जास्पद वाटणाऱ्या, उच्च-निचतेचा किळसवाणा भेदभाव पसरविणाऱ्या, बँड कलावंताचा अपमान करणाऱ्या वेबसिरीज वर बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


यासोबतच अशा प्रकारच्या वेबसिरीज निर्माण करणाऱ्या निर्माते आणि अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात मानवी मुल्यांची अवहेलना करणे, मानवी मुल्यांना पायदळी तुडवणे, लोकांचा स्वाभिमान नाकारणे, ही माणसे खालची दर्जाची आहे, असा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं उच्च-निचता या भेदभावाला खत पाणी घालणे आहे. अशा प्रकारचे कृत्ये केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. या प्रकारचे निवेदन लहू सेनेने नागपूर जिल्हाधिकारी बनकर यांच्यामार्फत देण्यात आले आहे. महेश मांजरेकर यांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Nagpur News : दिवसा रेकी अन् रात्री घरफोडी ; नागपूर पोलिसांकडून तीन सराईत चोरांना अटक