Nagpur News : सदर परिसरातील (Sadar) बार संचालकाकडून हप्ता वसुली आणि पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर अखेर पोलिसांकडून फारिस कादरी याला अटक करण्यात आली आहे. फारिस कोरोना काळापासून धुमाकूळ घालत होता. अनेक नेते, अधिकारी यांना फोन करुन त्यांना प्रश्न विचारुन त्याच्या क्लिप तो व्हायरल करत होता. आतापर्यंत त्याच्याविरोधात तक्रार झाली नसल्याने पोलीस कारवाई करण्यास असमर्थ होते. मात्र पोलीस (Nagpur Police) कर्मचाऱ्याला मारहाण करुन शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ पुढे आल्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले. फारिस हा हप्ता वसुलीच्या प्रकरणात अटकेत आहे. त्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या या प्रकरणात त्याच्यावर पुन्हा एक नवीन गुन्हा नोंदवण्यात आला.
क्लिप व्हायरल करुन दबाव
फारिस कादरीवर पोलिसांनी शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. फारिसच्या वडिलांचे साडीचे दुकान आहे. त्याच्या कृत्यामुळे त्याचे कुटुंबीयही त्रस्त आहेत. कोरोनाकाळात फारिस चर्चेत आला. तो नेता आणि पोलीस अधिकाऱ्यांना फोन करुन खोचक प्रश्न विचरत होता. हे संभाषण तो सोशल मीडियावर व्हायरल करुन त्याने प्रसिद्धी मिळविली. मोठ्या नेत्यांशी वादग्रस्त मुद्यांवर चर्चा करुन व्हायरल केल्यामुळे नागरिक त्याच्यापासून चार हात दूर राहू लागले. त्यानंतर फारिसने असामाजिक तत्वांना ब्लॅकमेल करुन वसुली सुरु केली.
फुटकची सवय महागात
सहज पैसे मिळत असल्यामुळे त्याला मोफत जेवण आणि दारुची सवय लागली. अनेक नामवंत हॉटेल आणि बारमध्ये फारिस नेहमीच भोजन आणि दारुसाठी जायचा. नकार दिल्यास महानगरपालिका आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांना फोन करुन कारवाईची धमकी देत होता. सुरुवातीला काही हॉटेल संचालकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे फारिसने त्यांना आपली महानगरपालिका आणि एफडीए अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याची क्लिपिंग पाठवून फुकटात दारु आणि जेवणासाठी दबाव टाकत होता. या प्रकरणात सदर येथील बारचे संचालक सोहनसिंग वाधवा यांच्याशिवाय इतर पीडितांनी तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अनेक मंत्र्यांसोबतचे संभाषण व्हायरल
कोरोना काळात विविध मुद्द्यांवर फारीस कादरी हा मंत्र्यांशी फोनवर संपर्क साधायचा. तसेच त्यांना खोचक प्रश्न विचारुन त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग करत होता. त्याने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, आमदार नवनीत राणा, माजी आरोग्य मंत्री टोपे, मुख्यमंत्री यांच्यासह आदींना फोन करुन त्यांच्यात झालेले संभाषण व्हायरल करुन प्रसिद्धी मिळविली होती. तर एका नेत्याच्या इशाऱ्यावर फारिसचा 'गेम; झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या