Nagpur News Update : डॉ. दंदे फाउंडेशनच्या वतीने विदर्भातील शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी 'व्हॉईस ऑफ लिटील मास्टर्स' या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विदर्भातून सुमारे दोन हजारांवर विद्यार्थी आणि शिक्षक या श्रेणीमध्ये सहभाग नोंदविला होता. यापैकी अंतिम फेरीमध्ये विदर्भातील 10 विद्यार्थी आणि 6 शिक्षक अश्या एकूण 16 गायकांनी धडक दिली आहे. बुधवारी दुपारी 2.30 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात अंतिम फेरीला प्रारंभ होईल. स्पंदन भाजपाले – अमरावती, श्रावणी खंडाळे – नागपूर, चाणक्य चावळे – अमरावती, तनिष्क गजभिये – नागपूर, स्वरा लाड – यवतमाळ, स्वरदा कोरान्ने – नागपूर, स्वानंदी पाळसेकर- नागपूर, पार्थ ढवळे – वाशीम, मुक्ता झाडे – वर्धा आणि नभा फांजे – अमरावती या विद्यार्थ्यांची, तर लक्षती काजळकर- नागपूर, प्रज्योत म्हैसकर – वर्धा, सोनाली बोहरपी – नागपूर, गणेश गवई – यवतमाळ, कविता वरगट – अकोला, प्रज्ञा खापरे – नागपूर या शिक्षकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
मंगळवारी, 11 आक्टोबर रोजी शंकरनगर येथील किर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकर सभागृहात उपांत्य फेरी पार पडली. यावेळी अमर कुळकर्णी, गौरी शिंदे आणि प्रफुल्ल माटेगावकर परीक्षक म्हणून उपस्थित होते. तर ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र तिवारी, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे, हर फाउंडेशनचे प्रमुख भूमिता व निखिलेश सावरकर यांच्या उपस्थितीत उपांत्य फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. यासोबतच बुधवारी सुप्रसिद्ध गायक-संगितकार डॉ. सलील कुलकर्णी यांचा 'माझे जगणे होते गाणे' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कविवर्य सुरेश भट सभागृहात सायं. 4.45 वाजता हा कार्यक्रम होईल. डॉ. सलील कुलकर्णी या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधतील आणि लोकप्रिय गाणी देखील सादर करतील. कवी नितीन भट या कार्यक्रमाचे सूत्रधार असतील.
यावेळी डॉ. सलील कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, तर संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी अध्यक्षस्थानी असतील. यावेळी डॉ. दंदे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यांची विशेष उपस्थिती असेल. 'माझे जगणे होते गाणे' ही डॉ. सलील कुलकर्णी यांची गप्पा-गाण्यांची लोकप्रिय मैफल आहे. यामध्ये कविता, गाणी आणि त्यांच्या निर्मितीमागची कहाणी ते उलगडणार आहेत. हा कार्यक्रम श्रोत्यांसाठी निःशुल्क असणार आहे, त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या