नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयात पदवी प्रवेशासाठी 8 जूनपासून प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार 1 ऑगस्टपर्यंत प्रवेशाची अंतिम मुदत होती. मात्र, बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्याने व विद्यापीठाकडे मागणी केल्याने विद्यापीठाने पदवी प्रवेशासाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे.


पदवी प्रवेशासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची होती. त्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेणे आवश्यक होते. मात्र नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याचे समोर आले आहे. यामुळे विद्यापीठाने पदवी प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे. पदवी प्रथम वर्षांच्या प्रवेशापूर्वी सामान्यतः अभियांत्रिकी, कृषी व औषधनिर्माण शास्त्र प्रवेशासाठी सामायिक परीक्षा घेतली जाते. यावर्षी मात्र सीईटी झाली नसल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांनी पदवी अभ्याक्रमात प्रवेश घेतले नाहीत. यामुळे मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. यासोबतच प्रवेशाबाबत महाविद्यालयात व विद्यापीठाकडे विचारणा केली जात आहे.


सीईटीनंतर प्रवेशाला वेग


एमएचसीईटी परीक्षा सुरू झाल्या आहेत. या परीक्षेच्या निकालानंतर प्रवेशाला सुरुवात होणार आहे. विशेषतः कृषी अभ्यासक्रमात प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थी बीएसस्सीमध्ये प्रवेश घेतात. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असते. यामुळे बीएसस्सीचे प्रवेश लांबतात. याशिवाय अभियांत्रिकीच्या सीईटी व नीट नंतरही बी.एसस्सी.मध्ये प्रवेश घेतले जातात. यामुळे विद्यापीठाने वाढवून दिलेल्या तारखांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होतात.


पीजीपीईई नोंदणीलाही मुदतवाढ


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागासाठी यावर्षी प्रवेशपूर्व परीक्षा (प्री एन्ट्रान्स एक्झान-पीईई) घेतली जाणार आहे. मात्र विद्यापीठाच्या अनेक विभागात प्रवेशासाठी पीईई घेता येतील येवढीही नोंदणी झाली नसल्याने विद्यापीठाने नोंदणीला पाच दिवसांची मुदतवाढ दिली आहे.


विद्यापीठाने यावर्षीपासून संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेशासाठी केंद्रीय पद्धत बंद केली. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर प्रवेशासाठी आर्थिक लुबाडणूक होण्याची शक्यता असली तरी मोठ्या प्रमाणात महाविद्यालयात प्रवेश झाले असल्याचे नोंदणीवरुन दिसून येते. यामुळेच विद्यापीठाला पीईईचे नव्याने सुधारित वेळापत्रक जारी करावे लागले आहे. यामुळे विद्यापीठाने घेतलेला निर्णय त्यांच्याच अंगलट आल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पदव्युत्तर विभागात प्रवेशाच्या पीईईसाठी आता विद्यार्थ्यांना 12 ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येईल. शिवाय विद्यापीठाने परीक्षेची तारीखही वाढविली आहे. 11 ऑगस्टला होणारी पीईई परीक्षा आता 18ऑगस्टला होईल. परीक्षेचा निकाल 22 ऑगस्टला जाहीर केला जाईल. तर 28 ऑगस्टपर्यंत प्रवेश घ्यावे लागणार असून 1 सप्टेंबरपासून वर्ग सुरू होतील.


म्हणून मुदतवाढ


विद्यापीठाकडून पदव्युत्तर प्रवेशाच्या पीईईसाठी 1 ऑगस्टपासून नोंदणीला सुरुवात झाली. 7 ऑगस्टपर्यंत नोंदणीची अंतिम मुदत होती. अंतिम मुदतीपर्यंत विद्यापीठातील 2 हजार 600 जागांसाठी 1 हजार 800 अर्ज आले. विशेष म्हणजे मानव्यशास्त्र विभागाच्या 2 हजार 200 जागांसाठी केवळ 700 तर विज्ञान विभागाच्या 400 जागांसाठी 1 हजार 100 अर्ज प्राप्त झाले.


Maharashtra Cabinet Expansion : तर अकेला बच्चू कडू काफी है, मंत्रिमंडळ विस्तारानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI