RTMNU: बीए मराठीतून महानुभाव साहित्य वगळले, रातुम नागपूर विद्यापीठातील प्रकार उघडकीस

एबीपी माझा वेब टीम Updated at: 01 Aug 2022 07:38 PM (IST)
Edited By: अक्षय गांधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला महानुभाव साहित्य अभ्यासकांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांचा प्रचार प्रसार व्हावा. हा अध्यासन निर्मितीमागील प्रमुख उद्देश आहे.

file pic

NEXT PREV

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बी.ए. च्या अभ्यासक्रमात महानुभाव साहित्याचा ग्रंथ स्वतंत्र रूपाने परंपरेने सतत राहत आला आहे. आता तो मराठी साहित्यातून बी.ए. करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार नाही. बी.ए. मराठी च्या अभ्यासक्रमातून महानुभावाचे स्वतंत्र साहित्यच वगळण्यात आले आहे. यामुळे महानुभाव पंथीयांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. 


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला महानुभाव साहित्य अभ्यासकांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. त्यामुळेच शासनाच्या निर्देशानुसार दोन वर्षांआधी विद्यापीठात भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन स्थापन केले गेले. त्याला शहराच्या मध्यभागी विद्यापीठाचा परिसर उपलब्ध करून देण्यात आला. महानुभाव साहित्याची विशेष दखल घेण्यात यावी. त्यावर सखोल संशोधन संपादन अभ्यास करण्यात यावा व त्यातील सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांचा प्रचार प्रसार व्हावा. हा अध्यासन निर्मितीमागील प्रमुख उद्देश आहे. 


विद्यापीठाच्या हेतुवर शंका 


विद्यापीठात गेल्या शतकभरात बी.ए. आणि एम.ए. च्या विद्यार्थ्यांना आद्य मराठी महानुभाव साहित्याचा अभ्यास करणे अनिवार्य होते परंतु यावर्षी महानुभाव साहित्याला बी.ए. च्या अभ्यासक्रमातून हद्दपार केल्याचे दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर मराठी साहित्याचा अभ्यास करणारे बी.ए.चे विद्यार्थी असताना त्यांना साथी महानुभाव साहित्याची ओळखसुद्धा होऊ नये, असा तर त्यामागे हेतू नाही ना? अशी शंका महानुभाव विचारकांनी व्यक्त केली.  


अभ्यासक्रमात समावेश असावा कारण...



  • महानुभाव साहित्याचा समावेशामागे नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असलेली पथाची एतिहासिक पार्श्वभूमी आहे.

  • महानुभाव साहित्याची कर्मभूमी म्हणून विदर्भाची ओळख, मराठीचा आद्यग्रंथ लीळाचरीत्राची रचना विदर्भातील.

  • त्यामुळे विद्यापीठाच्या साहित्याच्या अभ्यासक्रमात महानुभाव साहित्याचा ग्रंथ स्वतंत्रपणे अभ्यासक्रमात समाविष्ठ.

  • विद्यापीठाच्या नव्या बी.ए. अभ्यासक्रमात संपूर्ण साहित्य केवळ एका प्रकरणापुरते मर्यादित करण्यात आले.

  • महानुभाव पंथियांत संताप, साहित्य समावेश करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा



अभ्यासक्रमातून महानुभाव साहित्य वगळणे हा संतापजनकच प्रकार आहे. महानुभाव साहित्याचा आजवर ज्या प्राधान्याने अभ्यासक्रमात समावेश केला जायचा, त्याच प्राधान्याने पुन्हा तो समावेश करून घ्यावा. अन्यथा, महानुभाव पंथीय रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.- नरेंद्र खेडीकर, अध्यक्ष, श्री दत्तात्रेयप्रभू नवयुवक महानुभाव मंडळ 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI
Published at: 01 Aug 2022 07:38 PM (IST)

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.