नागपूर : वारंवार मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईला ही दाद न देणाऱ्या तळीरामांना नागपूर पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. या आधी ही ड्रंक अॅन्ड ड्राइव्हच्या कारवाईला सामोरे गेलेले आणि मंगळवारी (31 डिसेंबर) रात्री नवीन वर्षाच्या उत्साहात पुन्हा मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांचे वाहन चालवण्याचे परवाने कायमस्वरूपी रद्द करा अशी विनंती नागपूर पोलिसांनी परिवहन विभागाकडे करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे नागपुरात शेकडो तळीरामांचे वाहन चालवण्याचे परवाने रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवले होते. पन्नास ठिकाणी नाकाबंदी करून वाहतूक नियमाचा उल्लंघन करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली होती. त्यामध्ये तब्ब्ल 592 तळीराम वाहन चालकांना पकडून त्यांची वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. यापैकी किती वाहनचालक अशाच पद्धतीने या आधीही ड्रंक अॅन्ड ड्राईव्हच्या कारवाईत पकडले गेले होते. याची माहिती पोलिसांनी काढली आहे. अशा सर्व वाहन चालकांचे वाहन चालवण्याचे परवाने कायमस्वरूपी रद्द करा अशी मागणी वाहतूक पोलिसांनी आरटीओकडे केली आहे.
Nagpur Crime | नागपुराच एटीएमवर चोरट्यांचा डल्ला, सीसीटीव्हीसुद्धा नष्ट | ABP Majha




तसेच काल रात्रीच्या कारवाईत इतर वाहतूक नियमांचा उल्लंघन करणाऱ्या सुमारे 500 वाहनांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वर्ष अपघात मुक्त ठेवण्यात नागपूरचे वाहतूक पोलीस यशस्वी ठरले आहे. मात्र, तळीराम वाहन चालकांना कायद्याचा हिसका दाखवण्यासाठी नागपूर पोलिसांनी उचललेल्या या पावलांचे नागरिकांकडून ही स्वागत होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 
पुणे काँग्रेस भवनची तोडफोड करणारे माझे कार्यकर्ते नाहीत : संग्राम थोपटे

Shivsena | मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत असंतोष, डझनभर आमदार नाराज असल्याची चर्चा