Indian Science Congress News : युद्धजन्य परिस्थितीमध्ये शत्रूंकडून बॉम्ब लावून सेनेचं नुकसान करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तसेच बॉम्ब निकामी करताना मोठ्या प्रमाणात जीवहानी होण्याची शक्यता असते. अशावेळी दोन किलोमीटर दूर बसून कुठल्याही जीवितहानीशिवाय ते निकामी करण्याचे तंत्रज्ञान संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे (Defence Research and Development Organisation) विकसित करण्यात आले आहे. 'दक्ष' (UXOR) असे या रोबोटचे नाव आहे. इंडियन सायन्स कॉंग्रेसमधील प्राईड ऑफ इंडिया या DRDO च्या डोम बाहेर हे रोबोट विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहे.


या रोबोटद्वारे तब्बल एक हजार किलो विस्फोटक निकामी करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. हे तंत्रज्ञान लवकरच वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. विदेशी सैन्याशी लढत असताना अनेकदा सीमेवर लॅन्ड माइन्स ( Land Mines) आणि इतर स्फोटके पेरण्यात येतात. अशावेळी आपल्या सैन्यासाठी ते घातक ठरतात. अशा स्फोटकांना निकामी करण्यासाठी अनेकदा मानवी यंत्रणा कमी पडते. त्यामुळे वायुसेनेमार्फत (Air Force) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला (डीआरडिओ) एक टास्क देण्यात आला होता. त्यातून 'दक्ष' (UXOR)ची निर्मिती करण्यात आली आहे.


जवळपास एक हजार किलो विस्फोटके निकामी करता येणे सहज शक्य होते. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे हे दोन किलोमीटर अंतरावरून सहजरीत्या वापरता येत असल्याने मानवी हानीची शक्यता जवळपास नसल्यासारखी आहे. विशेष म्हणजे जेसीबीच्या आकाराच्या असलेल्या या उपकरणाला 11 कॅमेरे लागले आहेत. त्यांतून परिसरातील इत्यंभूत माहिती घेता येणे सहज शक्य होते. दोन आर्म हे समोर येणारा प्रत्येक अडथळा पार करण्यासाठी मदतीचे ठरतात. त्यामुळे येणाऱ्या काळात ते केवळ वायुसेनेलाच नव्हे तर स्थल सेनेलाही अतिशय उपयुक्त ठरणार आहे.


संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे (डीआरडिओ) विकसित करण्यात आलेले दक्ष अद्ययावत तंत्रज्ञान आता वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. त्यासाठी वायुसेनेद्वारे टास्क देण्यात आले होते. त्यामुळे स्फोटके निकामी करण्यात ते अतिशय मदतगार ठरणारे असल्याची माहिती डीआरडिओ डिझाईन टीमच्या कथीका रॉय यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कॉम्पसमध्ये आयोजित 108 व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसच्या नागपुरात सुरू असलेल्या कार्यक्रमात दिली. 


ही बातमी देखील वाचा...


गुळभट्टी होणार 80 टक्के धुरमुक्त, प्लास्टिक पासून तयार केले डिझेल ; केंद्राच्या कौन्सिल ऑफ सायटिफिक अॅन्ड इडस्ट्रीअल रिसर्चचे अनोखे तंत्रज्ञान


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI