नागपूर: शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी घरी जाणाऱ्या नागरिकांना सर्वाधक त्रास सहण करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी हे कुत्रे बेसावधपणे नागरिकांवर तुटून पडतात. रस्त्यांने ये-जा करणाऱ्यांना हा त्रास नेहमीच होत आहे. वारंवार तक्रारी केल्यानंतरही दखल घेतल्या जात नाही,अशी नागरिकांची तक्रार आहे. गेल्या वर्षी शहरात 6 हजार 806 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला होता. यामध्ये भटक्या कुत्र्यांसह काही पाळीव कुत्र्यांचाही समावेश आहे.


कुत्र्यांचा प्रश्न गंभीर


मुख्यत: शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, ठिकठिकाणी टाकला जाणारा कचरा यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाची आहे. गेल्या 2 वर्षांपासून नसबंदी व लसीकरण करण्यात आलेले नाही, त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या कमालीने वाढली आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी हे कुत्रे वाहनांच्या मागे धावतात. त्यामुळे नागरिकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे.


लसीकरण बंद


2019 मध्ये नसबंदी मोहीम सुरू झाली पण नंतर ती थांबली. तक्रारीवरून आरोग्य निरीक्षकांनी संबंधित भागातील कुत्रे पकडून त्यांना जवळच्या केंद्रात दाखल केले, तेथे त्यांची निर्बीजीकरण तसेच रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली, मात्र गेल्या 2 वर्षांपासून हे काम बंद पडले आहे, त्यामुळे त्यांची संख्या वाढली आहे. शहरात कुत्रे वाढले आहेत.


Aamir Khan : आमिर खान अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात नतमस्तक; 'लाल सिंह चड्ढा' च्या टीमसोबत केली प्रार्थना


महालात 3 हजाराहून अधिक प्रकरणे


भटक्या कुत्र्यांबरोबरच नागरिकांना पाळीव प्राणी म्हणून पाळलेल्या कुत्र्यांनीही चावा घेतला आहे. या महाल भागात कुत्रा चावण्याच्या सर्वाधिक 3,556 घटना आहेत. त्यानंतर 1,744 प्रकरणे सदर विभागातील आहेत. मार्च 2022 मध्ये विक्रमी 817 लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला. गतवर्षीच्या तुलनेत भटक्या कुत्र्यांच्या चावण्याचे प्रमाण वाढले आहे. 2021 मध्ये 4,585 नागरिकांना तर मार्च 2022 पर्यंत 2,221 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. शहर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले म्हणाले की, नियमानुसार भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी सोडण्यात येणार आहे.


Bacchu Kadu Meets CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बच्चू कडू म्हणाले, "थोडी नाराजी आहे, पण..."


कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण 


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (वैद्यकीय) परिसरात 4 निवासी डॉक्टरांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना जखमी केले. यानंतर पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचे प्रकरण चर्चेत आले. महाविद्यालय परिसरात कुत्र्यांची संख्या जास्त असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


Varsha Bungalow : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'वर्षा' बंगल्यावर वास्तव्यास जाणार नाहीत!