नागपूरः 'गोविंदा आला रे'च्या गजरात गुरूवारपासून शहरात विविध ठिकाणी दही हंडीचे थरार नागपुरकरांना बघायला मिलत आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे दही हंडीवर बंधने असताना आलेल्या नव्या नियमात हा उत्सव साजरा करण्यात आला. यंदा मात्र उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याचे जाहीर केल्यानंतर शहरातील गोविंदा मंडळांमध्ये उत्साह दिसून आला. शहरातील काही प्रमुख मंडळांनी तशी जोरदार तयारी केली असून, नागपूरकरांना थरांवर थर असा नवा थरार बघायला मिळत आहे. जन्माष्टमीच्या दिवशीच शहरात या उत्सवाला जोरदार सुरूवात झाली. आज शनिवारी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यावतीने हिवरी लेआऊट येथे सायंकाळी पाच वाजता 'महागाईची दही हंडी' आयोजित करण्यात आली आहे. यासोबतच नंदनवन परिसरातील संगम चौक येथेही दही हंडीचे आयोजन करण्यात आले आहे.


शहरात सर्वात उंच अशा 6 ते 7 थर रचून दहीहांडी फोडण्याची परंपरा आहे. इतवारीतील नवयुवक मंडळाने ही परंपरा कायम राखली आहे. राज्य सरकारने थरांबाबत कोणतेही बंधने घातली नाही. मात्र, गोविंदांना 10 लाखांचा वीमाकवच दिला आहे. मुंबईप्रमाणेच नागपुरातही अनेक भागात विविध मंडळांतफें दहीहांडी स्पर्धा व थरार अनुभवण्याची संधी पुन्हा एकदा आली आहे. 


महिला स्पर्धकांना 51 हजार रुपये


गेल्या 40वर्षांपासून इतवारा नवयुवक मंडळातफें टांगा स्टॅंड, सराफा बाजार येथे मध्य भारतातील सर्वात उंच दहीहांडी स्पधेंचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही उत्साहात परिसरात दही हंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती. यावर्षी स्व.राकेश गुप्‍ता व स्‍व.विवेक मोटघरे यांच्‍या स्‍मृती प्रित्‍यर्थ गोविंदा-2022 महिला व पुरूषांची दहिहांडी झाली. 35 ते 40 फूट उंच दहीहंडी फोडणाऱ्या पुरुषांच्या विजयी चमूंना मंडळाच्या वतीने प्रथम पुरस्कार स्वरुपात 2,22,222 रूपये व स्‍मृतिचिन्‍ह देण्यात आले. तसेच महिला दहिहांडीच्या विजेत्या स्पर्धकांना बक्षिस रक्कम 51 हजार रुपये व स्‍मृतीचिन्‍ह देण्यात आले.


ताजबाग, संगम टॉकीज, बडकस चौकातही थरार


यंदाचा दहीहांडी उत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. बडकस चौक, संगम टॉकीज आणि छोटा ताजबाग परिसरातील आयोजन प्रमुख असते. टेलिफोन एक्स्चेंज चौकातही20 ऑगस्टला दहीहांडीचे आयोजन आहे. सक्करदऱ्यातील सोनझारीनगरात सर्वाधिक गोविंदा पथक असून, यात जय भोलेश्वर, जय महाकाली, जय श्री राम असे तीन पथक प्रसिध्द आहे. एका संघात 60 ते 70 गोंविदा असतात. जय महाकालीने यंदा महिला संघही तयार केला आहे. तिन्ही संघांनी दहा दिवसांपूर्वीपासून तयारी सुरू केल्याची माहिती जय भोलेश्वरचे संग्राम भिमारे यांनी दिली. येथे 7 थरांचा गोविंदा असतो.


Nagpur News : गोविंदांना आरक्षण : मु्ख्यमंत्र्यांनी प्रशासनिक बाबी लक्षात न घेता भावनिक होऊन निर्णय जाहीर केला : अजित पवार


सुरक्षा बाळगा


गोविंदांचा थरार करताना सुरक्षाही बाळगा असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले आहे. शहरातील अशा कार्यक्रमांना आमदार मोहन मते, उपायुक्त गजानन राजमाने यांच्यासारखे अनेक महत्वाची व्यक्ती दही  हांडीच्या कार्यक्रमांना हजेरी लावून गोविंदाचा उत्साह वाढविणार आहे.


आज आणि उद्या येथे आयोजन


-हिवरी ले आऊट शनिवार, 20 ऑगस्ट, सायंकाळी पाच वाजता
-संगम टॉकीज-शनिवार, 20 ऑगस्ट
-छोटा ताजबाग- रविवार, 21ऑगस्ट


बुस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये नागपूर अव्वल, आतापर्यंत 43,3121 नागरिकांनी घेतली प्रतिबंधात्मक लसीची तिसरी मात्रा