Covid Update Nagpur : राज्यभरात कोविड 19 रोगानं पुन्हा मान वर केली आहे . देशात सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांवर पोहचली असून राज्यात सध्या 494 सक्रिय रुग्ण आहे . दरम्यान, नागपूरमध्ये कोव्हिडच्या दोन रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे . मात्र, दोघांना इतर दुर्धर आजारही होते, वैद्यकीय भाषेत ते को मॉर्बिड होते.
मृत्यू झालेल्या दोन कोव्हिड रुग्णांमध्ये एक नागपुरातील रुग्ण असून दुसरा चंद्रपूरमधील रुग्ण होता.. तो नागपुरात रुग्णालयात उपचार घेत होता. दोघांना दुर्धर आजार होते आणि नंतर कोविडची लागण झाली होती. नागपुरात 1 जानेवारी ते 3 जून पर्यंत 17 कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सध्या फक्त 4 रुग्णावर उपचार सुरू आहे.असून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 11 रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
घाबरून न जाण्याचे आवाहन
राज्यात सध्या कोविड केसेस तुरळक आहेत. कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेला आवाहन करण्यात येते कि कोणीही घाबरून जाऊ नये. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती रुग्णसंख्या ?
मुंबई- 20 ठाणे-4पुणे-1 पुणे मनपा-17 पिंपरी चिंचवड मनपा -2 सातारा -2 कोल्हापूर, मनपा -2 सांगली मनपा-1 छ. संभाजीनगर -1 छ. संभाजीनगर मनपा- 7 अकोला मनपा- 2
राज्यात सक्रीय असलेले रुग्ण 494 वर
- जानेवारी 2025 पासून केलेल्या कोविड चाचणी संख्या 12011 इतकी आहे. - जानेवारी 2025 पासून पॉझीटीव रुग्ण -873 - आज रोजी पर्यंत 369 रुग्ण बरे झाले आहेत.- दि.2 जून 2025 रोजी पॉझीटीव रुग्ण 59 इतके आहेत.आज रोजी सक्रीय असलेले रुग्ण 494 - जानेवारी 2025 पासून मुंबईमधील एकूण रुग्ण संख्या 483 ( जानेवारी1, फेब्रुवारी मार्च एप्रिल 4 मे 477)सर्व निदान झालेले रुग्ण हे सौम्य स्वरुपाचे आहेत.
हेही वाचा