नागपूर : लोकांना कोरोनामुळे किती भयंकर धोका आहे आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचं गांभीर्य कळावं यासाठी नागपूरचे झोन तीनचे डीसीपी राहुल माकणीकर यांनी आपल्या शायराना अंदाजात जनजागृती सुरु केली आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माकणीकर यांनी शायरीसह लोकांना घरी थांबण्याचा आग्रह केला आहे. राहुल माकणीकर यांचा कार्यक्षेत्र असलेला नागपुरातला परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे. त्या भागात लोकांचे घर छोटी छोटी आहेत. लोकसंख्या जास्त आहे, अनेक झोपडपट्ट्या आहेत. त्यामुळं तिथे लोकं घरात थांबत नाहीत आणि गल्लीबोळात बाहेर निघतात. त्यांना उद्देशून राहुल माकणीकर यांनी शायरीसह लोकांना घरी थांबण्याचा आग्रह करत व्हिडीओ शूट केला आहे.


माकणीकर यांची हीच ती जबरदस्त शायरी

बेजवह घर से निकलने की वजह क्या है...
मौत से आँख मिलाने की वजह क्या है?
सबको मालूम है कि बाहर की हवा है कातिल,
तो यूँ ही कातिल से उलझने की वजह क्या है?
दिल बहलाने के लिए घर में है वजह है काफी,
फिर यूँही गली में भटकने की वजह क्या है??

जिंदगी है एक नियामत, इसे संभाल कर रख...
कब्रगाहो और शमशानों को सजाने की वजह क्या है....
तूफ़ान के हालात है मेरे दोस्त,
ना किसी सफर में रहो, ईद के चाँद हो आपने घर के लिए,
खुशकिस्मती है कि उनकी नजर में ही रहो...

माना बंजारों की तरह घूमे हो हर डगर,
लेकिन वक्त का तकाजा है की अपने ही घर में रहो
तुमने खाक छानी है हर गली चौबारे की,
कुछ दिन की बात है मेरे दोस्त अभी अपने ही घर में रहो....

कदम चाह रहे है की बाहर घूम आये,
मन ने भी कहा जाना है तो चले जाओ,
लेकिन लौट के नहीं आ पाओगे,
रुक जाओगे तो जीवन को ना खोना पडेगा,
वरना कोरोना कहकर तुमको जिंदगी भर रोना पडेगा....

बड़े दौर गुजरे है जिंदगी के,
यह दौर भी गुजर जाएगा,
थाम लो अपने कदमो को घर में,
यह मंजर भी अपने आप थम जायेगा

India Lickdown | पोलिसांची नागरिकांना गाण्यातून साद; सहाय्यक फौजदार कळमकरांच्या गाण्याची चर्चा



आता जप्त केलेली वाहनं संचारबंदी हटल्यानंतर मिळणार
संचारबंदीच्या काळात नागपूर पोलिसांनी आजपासून त्यांच्या कारवाईच्या धोरणात महत्वाचे बदल केले आहेत. आजपासून नागपुरात कर्फ्यू पास देणे बंद करण्यात आले आहेत. गेले काही दिवस अनेक नागपूरकरांनी कर्फ्यू पासेसचा गैरवापर करत विनाकारण बाहेर फिरण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे रस्त्यावर कारणाशिवाय फिरणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय दिसत होती. त्यामुळे नागपूर पोलिसांनी अत्यावश्यक सेवा वगळता कर्फ्यू पास देणेच बंद केले आहे. शिवाय आजपासून कोणताही वाहनचालक विनाकारण विना अनुमती रस्त्यावर आढळला तर त्याचे वाहन थेट संचारबंदी संपेपर्यंत जप्त केले जाणार आहे. त्यामुळे नागपूरकरांनी आता तरी संचारबंदीचे नियम पाळले नाही आणि विनाकारण घराबाहेर फिरण्याचा धाडस केलं तर त्यांचे वाहन कोरोनाचा संकट टळेपर्यंत त्यांना परत मिळणार नाहीय.