Vasant Purke : 2014 मध्ये चमत्कार झाला आणि एक फेकू नेतृत्व समोर आलं. काँग्रेस इंग्रजांना घाबरले नाही, तर यांना काय घाबरणार असे म्हणत काँग्रेसचे नेते वसंत पुरके (Vasant Purke) यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. पिसाळलेल्या कुत्र्यासारखं काँग्रेसला वागता येत नाही. मात्र, हे पिसाळलेल्या कुत्र्यासारखं अंगावर येत असल्याचे पुरके म्हणाले. जेव्हा स्वातंत्र्य मिळत होतं तेव्हा हे आरएसएस वाले घरी लपले होते, असेही पुरके म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ नागपुरातील ईडी कार्यालयासमोर काढलेल्या मोर्चात पुरके बोलत होते.
नरेंद्र मोदी पत्रकारांसमोर का येत नाहीत? असा सवालही पुरके यांन उपस्थित केला. मोदी संसदेत बोलतात, मात्र पत्रकारांसोबत बोलत नाहीत असेही ते म्हणाले. नागपुरातील सेमिनरी हिल्स परिसरात ईडी कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन सुरु झाले आहे. राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर हे आंदोलन केले जात आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. काँग्रेसचे इतर नेते दाखल झाले आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुनील देशमुख, माजी आमदार वसंत पुरके आंदोलनस्थळी पोहोचले असून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. त्यानंतर राहुल गांधी आज ईडीपुढं जबाब नोंदवणार आहेत. याविरोधात काँग्रस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसनेही याविरोधात जोरदार आंदोलन केलं आहे. सुनो तानाशाहा, तोतों से डरा न पाओगे तुम हाथकंडों से हमें झुका ना पाओगे असे म्हणत भाजपविरोधी घोषणाबाजी केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज ईडीसमोर (ED) आपला जबाब नोंदवत आहेत. राहुल गांधी ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांना ईडीनं पाठवलेल्या समन्स विरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दिल्लीत मोर्चा काढणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर एक पोस्टर लावले आहे. हे पोस्टर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर 'सत्य झुकेगा नही'! असं लिहलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Congress Agitation : राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर, भाजपविरोधी जोरदार घोषणाबाजी
- नॅशनल हेराल्डप्रकरणी राहुल गांधी आज ईडीसमोर हजर राहणार; घोषणाबाजी करताना काँग्रेसच्या कार्यकर्त्याना पोलिसांनी घेतले ताब्यात