नागपूर : मुख्यमंत्री विदर्भ द्रोही आहेत, त्यांनी वेगळ्या विदर्भ राज्यासाठी काहीच केले नाही, त्यामुळे यंदा विदर्भात आणि मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण पश्चिम या मतदारसंघात परिवर्तन घडेल असा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे. नितीन गडकरी मला पितृतुल्य असून त्यांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे असं सूचक वक्तव्यही आशिष देशमुख यांनी केलं आहे.


आशिष देशमुख यांनी आज काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात त्यांची थेट लढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत होणार आहे. त्यामुळे दीड वर्षांपूर्वीपर्यंत एकाच पक्षात असलेले मुख्यमंत्री आणि आशिष देशमुख यांच्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहणार आहे.

Assembly Election | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उमेदवारी अर्ज भरणार, मुख्यमंत्री विरुद्ध आशिष देशमुख रंगणार सामना | नागपूर | ABP Majha



विशेष म्हणजे याच मतदारसंघातून 2004 मध्ये आशिष देशमुख यांचे वडील आणि तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसयांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्या निवडणूकीत प्रदेशाध्यक्ष असतानाही रणजित देशमुख यांचा पराभव झाला होता आणि त्यानंतरच रणजित देशमुख यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली होती. आता रणजित देशमुख यांचे चिरींजीव आशिष देशमुख देवंद्र फडणवीस यांना आवाहन देत आहेत. त्यामुळे आधी पित्याला आणि नंतर पुत्राला हरवण्याचा अनोखा विक्रम मुख्यमंत्री बनवतात का असा सवाल नागपुरात चर्चेत आहे.

Yashomati Thakur | "आशिष देशमुख स्वत: अस्थिर, आधी स्थिर व्हावं" - यशोमती ठाकूर | ABP Majha