Pune Bypoll election : कॉंग्रेसने पोटनिवडणुकीत कुटुंबातील व्यक्तींना तिकीट देऊन सुद्धा भाजपने तेव्हा प्रतिसाद दिला नव्हता. भाजप राज्यात बिनविरोधाचा पायंडा म्हणतात. मात्र पायंडा फक्त आम्ही पाळायचा का, असा सवाल कॉंग्रेस नेते माजी मंत्री विजय वड्डेटीवार (vijay wadettiwar) यांनी उपस्थित केला आहे. तसेच भाजपने कसबा पेठ मधील पोटनिवडणुकीत कुटुंबात सुद्धा उमेदवारी दिली नसल्याने बिनविरोध निवडणुका होणे शक्य नसल्याचेही स्पष्ट केले.
पुढे वडेट्टीवार म्हणाले, ' महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुका बघितल्या तर फक्त मुंबईमध्ये बिनविरोध झाली आहे. मुंबईतही भाजपला पराभव दिसत असल्याने त्यांनी पाठिंबा दिला होता. तसेच इतरही निवडणुका बिनविरोध करता आल्या असत्या. तसेच पुण्यातील कसबा, पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली, असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.'
'ही चर्चा माध्यमांसमोर नव्हे पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर व्हावी'
बाळासाहेबांनी खुलासा केलेला आहे. बाळासाहेबांना काय सांगायचं ते तेच सांगू शकतील आणि ज्या काही चर्चा असेल ते पार्टीच्या प्लॅटफॉर्मवर होईल. मला या संदर्भात अधिक बोलायचं नाही. मात्र जे सुरू आहे आणि जे झालं आहे. त्या संदर्भात पक्षात चर्चा अपेक्षित आहे. सत्यजीत तांबे यांनी आपली भूमिका मांडली. प्रदेशाध्यक्षांनी आपली भूमिका मांडली. मात्र ही चर्चा माध्यमांसमोर कशाला? तांबे बाहेर बोलले तर त्यांना बंधन नाही. मात्र जी चर्चा आहे ती पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर झाली पाहिजे. 10 तारखेला पक्षाने एक बैठक बोलावली आहे. त्या ठिकाणी या परिस्थितीचा आढावा सुद्धा घेतला जाणार असल्याचे यावेळी वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
नाना पटोले यांच्याबाबत बोलतांना वडेट्टीवार म्हणाले, ' नाना पटोलें (Nana Patole) वर कोण नाराज आहे कोण नाही हे मला माहित नाही. मी या संदर्भात अधिक बोलणार नाही. जो कोणी नाराज असेल त्यांनी ते पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर मांडावे बाहेर मांडण्याची गरज नाही.
कसब्यात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला
पुण्यातील कसबा मतदार संघाची उमेदवारी महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना घोषित करण्यात आली आहे. त्यासंदर्भात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करत ही उमेदवारी जाहीर केली आहे.
ही बातमी देखील वाचा...