Nagpur congress Agitation : काँग्रेस नेते राहुल गांधींची ईडीनं चौकशी केली आहे. या चौकशीच्या  विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज नागपूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजपविरोधी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी काँग्रेसच्या आंदोलकांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेट्सवरुन पुढे जाण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते हजर होते. यावेळी काँग्रेसच्या आंदोलकांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात काँग्रेसचे नेते देखील सहभागी झाले आहेत. कालच मुंबईत काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढला होता. आता सर्वच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काँग्रेसच्या वतीनं काढण्यात येत आहे. कोणतेही गटातटाचे राजकारण न करता काँग्रेस कार्यकर्ते आज नागपूरमध्ये एकत्र आले आहेत. दरम्यान, या आंदोलकांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते बॅरिकेट्स ओलांडून आत जाण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 




नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी यांची सलग तीन दिवस जवळपास 30 तास चौकशी करण्यात आली. पुन्हा एकदा ईडीने (ED) त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तर दुसरीकडे देशातील कॉंग्रेस पक्ष त्याविरोधात प्रचंड संतापला असून कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचा सत्याग्रह दडपण्यासाठी दिल्ली पोलिस केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, तीन दिवसांच्या चौकशीदरम्यान राहुल गांधींच्या वक्तव्याचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यांची विधाने ए 4 आकाराच्या कागदावर टाईप केली जात आहेत. तसेच त्यावर मिनिट-मिनिटावर स्वाक्षरी केली जात आहे आणि नंतर तपास अधिकाऱ्यांकडे सोपवली जातात. पीटीआय या वृत्तसंस्थेने तपास एजन्सीच्या सूत्रांचा हवाला देत सांगितले की, राहुल गांधी यांची एजेएलच्या मालकीच्या सुमारे 800 कोटी रुपयांच्या मालमत्तेबाबत आणि ‘यंग इंडियन’ ही ना-नफा कंपनी भाडेतत्त्वावर घेण्याच्या व्यावसायिक हालचाली कशा करत होती याबद्दल चौकशी केली जात आहे. त्याची जमीन आणि इमारती. या प्रकरणी एफआयआर नसल्याचा काँग्रेसचा दावा आहे. तसेच हा ‘अनुसूचित अपराध’नाही, ज्याच्या आधारावर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याचा (पीएमएलए) गुन्हा नोंदवला जावा आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना समन्स बजावण्यात यावे.


महत्वाच्या बातम्या: