भंडारा : बहिणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडल्याने भावाने आई-वडिलांच्या मदतीने प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घटना घडली आहे. अनिकेत बडोले (वय 22 वर्ष) असं मृत मुलाचं नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.
साकोली तालुक्यातील किही-एकोळी गावातील अनिकेतचे त्याच गावातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. 18 जानेवारी रोजी अनिकेत मुलीसह तिच्याच घरी आक्षेपार्ह अवस्थेत सापडला. यानंतर मुलीच्या भावाने आणि वडिलांनी त्याला बेदम मारहाण करत, टी-शर्टने गळा आवळून खून केला. मग त्याचा मृतदेह गावाशेजारी असलेल्या नाल्यात फेकून दिला.
अनिकेत बेपत्ता झाल्याने त्याचा भाऊ तुषार बडोले यांनी साकोलीच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांना नाल्यात अनिकेतचा मृतदेह आढळला. 20 जानेवारीला जवळपास 20 तासांनी त्याचं शवविच्छेदन झालं.
मुलीचा भाऊ, आई आणि वडिलांनी अनिकेतचा खून केल्याचं तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी मुलीचे वडील रामेश्वर वालदे, आई ममता वालदे, भाऊ मेघराज वालदे यांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
तरुणाकडून बहिणीच्या प्रियकराची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jan 2019 07:22 AM (IST)
साकोली तालुक्यातील किही-एकोळी गावातील अनिकेतचे त्याच गावातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. 18 जानेवारी रोजी अनिकेत मुलीसह तिच्याच घरी आक्षेपार्ह अवस्थेत सापडला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -