Nagpur Crime : आईवरुन शिवी दिल्याच्या रागातून रिक्षाचालकाने तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना नागपुरात घडली. दारुच्या नशेत त्याने हे कृत्य केलं. महत्त्वाचं म्हणजे रिक्षाचालक आणि मृत तरुण दोघेही दारुच्या नशेत होते. प्रकाश उर्फ राजू लल्लू धकाते (वय 28 वर्षे, विनोवा भावेनगर) असे मृताचे नाव असून सतीश पांडुरंग मुळे (वय 27 वर्षे) असे मारेकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार दारु प्यायल्यानंतर झालेल्या वादातून एका ई-रिक्षाचालकाने तरुणाचा बळी घेतला. विशेष म्हणजे घटनेनंतर आरोपीने स्वतः पोलीस स्टेशन गाठून माहिती दिली. हा थरार यशोधरा पोलिस ठाण्यांतर्गत (Yashodhara Nagar Police Station) वीटभट्टी परिसरात घडला.
दोघांमध्ये वाद अन् हाणामारी
सतीश हा ई-रिक्षा चालक असून, तो गुन्हेगारी (Criminal) प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर मारहाणीचा गुन्हाही दाखल आहे. मृत राजू हा बेरोजगार आहे. बुधवारी (28 सप्टेंबर) दुपारी दीडच्या सुमारास दोघेही वीटभट्टी चौका जवळील (Vitabhatti chowk) मैदानात दारु पीत होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. राजूने सतीशला आईवरुन शिवी दिली. त्यामुळे तो चिडला. दोघांमध्येही हाणमारी झाली. यावेळी त्याने राजूच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर दगडाने वार करुन गंभीर जखमी केले. त्यावेळी घटनास्थळी कोणीही नव्हते.
स्वतः गेला पोलिस ठाण्यात
घटनेनंतर सतीश घाबरला आणि त्याने यशोधरानगर पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. तोपर्यंत राजू जिवंत होता. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (Died during treatment) झाला. यानंतर पोलिसांनी सतीशला ताब्यात घेतले.
दारु उतरल्यावर सांगितले खरे कारण
पोलीस ठाणे गाठल्यावर सतीशने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत राजूला ओळखण्यास नकार दिला. तसेच राजू त्याला वाटेत भेटला होता. वनदेवीनगर चौकाच्या अगोदरच तो ई-रिक्षातून (e-rickshaw) उतरला आणि त्याने 20 रुपयांऐवजी 10 रुपये भाडे दिले. भांडण झाल्याने तो राजूसोबत घटनास्थळी गेला आणि तिथे त्याच्यावर हल्ला झाला. नशा उतरल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता सतीशने आईला शिवीगाळ केल्याने खून केल्याची कबुली दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Nagpur Crime : नागपुरातील गुन्हेगारीचा आलेख चढताच, तरुणावर चाकूने वार करत 20 लाख रुपये लुटले
Nagpur Crime : प्रेयसी इन्स्टाग्रामवर दुसऱ्या युवकाशी बोलायची! तरुणाने उचलले टोकाचे पाऊल