Nagpur Crime News : मध्यवर्ती कारागृहात तीन दिवसांपूर्वी न्यायालयीन पेशीवरून आलेल्या प्रणय बोरसे या कैद्याकडे सापडलेल्या मोबाईल आणि बॅटरी जप्त करण्यात आली. प्रकरणात धंतोली पोलिसांनी (Nagpur Police) आता मालेगाव आणि गुजरात कोर्टाकडे प्रोडेक्शन वॉरन्टसाठी अर्ज केल्याची माहिती आहे.


प्रणय बोरसे (वय 34) तो खंडणी आणि रॉबरीच्या प्रकरणात कारागृहात बंदिस्त आहे. त्याला गुजरातच्या न्यायालयात पेशीसाठी घेऊन गेले होते. शनिवारी सकाळी नागपुरात आल्यानंतर कारागृह कर्मचाऱ्यांनी अंगझडती घेतली असता त्याच्या अंतरवस्त्रात मोबाईल, बॅटरी आणि एमसील मिळाले होते. यापूर्वी नागपूरच्या कारागृहात सप्टेंबर 2022 आणि त्यापूर्वी सुद्धा मोठ्याप्रमाणावर मोबाईल, बॅटरी व इतर साहित्स सापडले होते. 


प्रणयवर मालेगावात खंडणी आणि रॉबरीचे गुन्हे असून गुजरातमध्येही गुन्हा नोंद आहे. यापूर्वी तो औरंगाबाद कारागृहात सात वर्षे होता. अलीकडेच म्हणजे 2018 मध्ये त्याला नागपूरच्या कारागृहात हलविण्यात आले. चार वर्षांपासून तो मध्यवर्ती कारागृहात आहे. येथे त्याच्या अनेक कुख्यात गुंडाशी मैत्री झाली होती. दरम्यान त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी धंतोली पोलिसांना प्रणय बोरसे याची चौकशी करायची आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी मालेगाव आणि गुजरात कोर्टाकडे प्रोडक्शन वॉरन्टसाठी अर्ज केला आहे.


तंडेलवार केव्हा ताब्यात येणार 


दीड महिन्यांपूर्वी कारागृहात मोबाईल आणि गांजा पुरविणाऱ्या दोन कारागृह रक्षकांना ताब्यात घेतले होते. त्यात निषेध वासनिक आणि वैभव लंडेलवार यांना त्यातून दीडशेहून अधिक कॉल्स केल्याची माहिती होती.


पहिल्या धाडीत पोलिस आल्यापावली परतले


यापूर्वी नागपूरच्या पोलीस (Nagpur Police) आयुक्तांनी फौजफाट्यासह नागपूर मध्यवर्ती कारागृहात टाकलेल्या पहिल्या धाडीत काहीच ठोस आढळून आले नव्हते. मात्र पुन्हा एकदा कारागृहात टाकलेल्या छाप्यात पोलीस शिपायांच्या मदतीने कुख्यात गुन्हेगारांना सर्रास गांजा, मोबाईल फोन, बॅटरी पुरवले जात असल्याचे रॅकेट उघडकीस आलं होते. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला होता. तसेच यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुख्यात श्रीकांत थोरात, गोपाल पराते, राहुल मेंढेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी अजिंक्य राठोड आणि प्रशांत राठोड यांचा समावेश होता. श्रीकांत थोरात, गोपाल पराते, राहुल मेंढेकर या तिघांवरही मोक्का आणि एमबीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. 


संबंधीत बातमी...


नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये एका कैद्याकडे मोबाईल फोन अन् तीन बॅटरी