नागपूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी समोर आली आहे. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड तोडफोड केली. या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी समोर आलेल्या सुरक्षाबलाच्या जवांनही जखमी झाले आहेत. शिवाय महिलांनाही धक्कबुक्की केल्याचा संतप्त प्रकार कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
निवेदन देण्यासाठी काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 30 ते 40 कार्यकर्ते विद्यापीठात दाखल झाले होते. कार्यकर्त्यांनी कुलसचिवांच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा बलाच्या जवानांनी त्यांना रोखलं असता त्यांनी धुडघूस घालायला सुरुवात केली.
कार्यकर्त्यांनी कुलसचिवांच्या कॅबिनच्या काचा फोडल्या. यावेळी सुरक्षा बलाचे जवान योगेश गांगुर्डे यांच्या अंगावर गेट पडल्याने ते जखमी झाले. तर महिला कार्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करत असताना महिला रक्षकाच्या हाताला दुखापत झाली.
विद्यार्थ्यांना मारु नका असा वरिष्ठांचा आदेश असल्याने आम्ही कारवाई केली नाही, असं सुरक्षाबलाचे जवान म्हणाले. पण एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये विद्यार्थी नव्हते. एबीव्हीपीची विद्यापीठात गोंधळ घालण्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वीही तीन वेळेस यांच्याकडून गोंधळ घालण्यात आला, अशी माहिती सुरक्षा बलाच्या जवानांनी दिली.
मागील काही दिवसांपासून कुलगुरु डॉ. सिद्धार्थ काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि कुलसचिव डॉ. नीरज खटी हे अधिकारी विद्यापीठात उपस्थित नसतात. तरीही त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश करण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला, अशी माहिती आहे. याप्रकरणी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांवर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं समोर आलं.
एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांचा नागपूर विद्यापीठात धुडघूस, महिलांनाही धक्काबुक्की
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Feb 2019 10:38 AM (IST)
कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी समोर आलेल्या सुरक्षाबलाच्या जवांनही जखमी झाले आहेत. शिवाय महिलांनाही धक्कबुक्की केल्याचा संतप्त प्रकार कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -