Nagpur News : नागपूर शहरात सध्या 984 हत्तीपायाचे रुग्ण आहेत. वेळेवर उपचार न झाल्यास रुग्णांना अपंगत्वही येऊ शकतो. रुग्णांची ही संख्या लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेतर्फे (NMC) मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे MMDP क्लिनिक (Morbidity Management and Disability Prevention)/ हत्तीरोग व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात आले. या क्लिनिकचे उद्घाटन नुकतेच मनपाचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये MMDP क्लिनिक सुरू करणारी नागपूर महानगरपालिका ही संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.
हत्तीरोग दुरीकरण मोहिमेस नागपूर महानगरपालिकेस सहकार्य करा
यापुर्वी हत्तीपायाची सर्व उपचार रुग्णांना हिवताप व हत्तीरोग विभाग, महाल येथे जाऊन द्यावे लागत होते. परंतू या MMDP क्लिीनिकमुळे त्यांना आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचाराची सुविधा मिळणार आहे. जेणेकरुन ते आपल्या पायाची योग्य काळजी घेऊ शकतील आणि त्यापासुन होणारे अपंगत्व टाळता येईल. सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन हत्तीरोग दुरीकरण मोहिमेस नागपूर महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.
नागपूर महानगरपालिकेअंतर्गत एकूण 984 हत्तीपायाचे रुग्ण
झोन क्र. | पुरुष | स्त्री | एकुण |
1 | 13 | 27 | 40 |
2 | 15 | 26 | 41 |
3 | 38 | 66 | 104 |
4 | 30 | 37 | 67 |
5 | 74 | 123 | 197 |
6 | 39 | 62 | 101 |
7 | 34 | 58 | 92 |
8 | 66 | 102 | 168 |
9 | 30 | 63 | 92 |
10 | 46 | 36 | 82 |
एकूण | 385 | 600 | 984 |
रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहा. सहसंचालक आरोग्य सेवा (हिवताप व हत्तीरोग) डॉ. निमगडे, WHO समन्वयक डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जास्मीन मुलानी आणि डॉ. कांचन टेंभुर्णे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडे, मानेवाडा UPHC वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कंवर यांच्यासह मानेवाडा युपीएचसीतील सर्व कर्मचारी, हत्तीरोग निरीक्षक अनिल दवंडे , प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुनील दातार, राजेश ठाकरे आणि सर्व हिवताप व हत्तीरोग कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मानेवाडा UPHC तील सर्व कर्मचारी, हत्तीरोग निरीक्षक अनिल दवंडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुनील दातार, राजेश ठाकरे आणि सर्व हिवताप व हत्तीरोग कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान मेश्राम यांनी केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या