नागपूर: दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत (Nagpur Division) इतवारी-दुर्ग सेक्शनमध्ये तिसऱ्या रेल्वेमार्गावर अत्यावश्यक कामे केली जाणार आहेत. त्यासाठी या सेक्शनमध्ये 30 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याकाळात धावणाऱ्या एकूण 58 प्रवासी गाड्या (passenger train) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात दररोज धावणाऱ्या 22 (Daily Trains) आणि 36 साप्ताहिक प्रवासी (Weekly Passenger Tains) गाड्यांचा समावेश आहे. 


काचेवानी ते तुमसर दरम्यानच्या तिसऱ्या मार्गासाठी काचेवानी स्थानकात हे काम करण्यात येणार आहे. 4 सप्टेंबर पर्यंत 12105  मुंबई- गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस नागपूरपर्यंतच धावेल. तर, 12106 गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस 5 सप्टेंबर पर्यंत नागपूरहूनच मुंबईकडे रवाना होईल. 11039 कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस देखील 4 सप्टेंबरपर्यंत नागपूरपर्यंतच धावेल. 11040 गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस 5 सप्टेंबरपर्यंत नागपूरहूनच कोल्हापूरच्या दिशेने रवाना होईल. 


'या' आहेत रद्द रेल्वेगाड्या, नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS


30 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान 18109 टाटा-इतवारी, 18110 इतवारी-टाटा, 18030/18029 शालीमार एक्स्प्रेस, 12810/12809 मेल, 12834/12833  हावडा-अहमदाबाद, 12130/12129 आझाद हिंद एक्स्प्रेस, 3 सप्टेंबरपर्यत 18238 छत्तीसगढ एक्स्प्रेस रद्द राहील. 5 सप्टेंबरपर्यंत 08743/44 गोंदिया-इतवारी-गोंदिया मेमू, 08267 रायपूर-इतवारी मेमू, 18239/40 कोरबा-इतवारी-बिलासपूर, 12855 इंटरसिटी, 18237 छत्तीसगढ एक्स्प्रेस रद्द राहील.  6 सप्टेंबरपर्यंत 08268 इतवारी-रायपूर मेमू, 12856 इंटरसिटी, 18110 इतवारी-टाटा या गाड्या रद्द राहतील. 12101 एलटीटी-शालीमार एक्सप्रेस 30 ऑगस्ट, 2 आणि  3 सप्टेंबरला, 12102 शालीमार-एलटीटी 1, 4 आणि  5 सप्टेंबरला, 11754 रीवा-इतवारी 31 ऑगस्ट आणि 3 सप्टेंबरला, 11753 इतवारी-रीवा 1 आणि 4 सप्टेंबर, 12771 सिकंदराबाद-रायपूर 31 ऑगस्टपासून 2 सप्टेंबरपर्यंत, 12772 रायपूर-सिकंदराबाद 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान रद्द राहील. याशिवाय 27 अन्य गाड्याही रद्द राहतील. प्रवाशांना आगाऊ माहिती मिळावी यासाठी आरक्षण चार्टनुसार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर रेल्वे रद्द करण्याचे संदेश पाठवले जात आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Chandicha Ganpati: चांदीचा गणपती : ब्रिटिशांचा रोष पत्करला अन् मिठाईच्या दुकानात गणेशाची स्थापना झाली!


Nagpur Ganeshotsav : सार्वजनिक गणेश मंडळांच्या निर्माल्यातून करणार खतनिर्मिती, मनपाचा उपक्रम; बुधवारपासून होणार संकलन कार्य सुरू