Nagpur News: नागपूरमध्ये एक 18 महिन्याची गोड मुलगी आहे जी या वयात पटापट अनेक वस्तू ओळखते, प्राण्यांची, पक्षांची नावे सांगते. इतकंच काय देशाच्या पंतप्रधानाच्या फोटो दाखवला तर ती लगेच सांगते की हे मोदीजी आहेत. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने देखील नोंद घेतली आहे. श्रीनंदा शुभंकर देशकर असं या 18 महिन्यांच्या मुलीचं नाव आहे. 


अवघ्या 18 महिन्याची श्रीनंदा शुभंकर देशकर ही दोनशेच्या वर वस्तुंची ओळख सांगते किंवा त्यांची नावं सांगते. वेगवेगळ्या प्राण्यांची नावं सांगताना ते प्राणी कसे आवाज करतात किंवा फळांची नावं सांगतांना त्याची चव कशी असते हे देखील श्रीनंदा सांगते. देशकर कुटुंबीय हे संयुक्त कुटुंब पद्धतीत राहते. श्रीनंदाच्या घरी आई-वडिलांसोबत, आजी-आजोबा, पंजी-पणजोबा, काका आहेत. त्यामुळे तिचा या कुटुंबातील सदस्यांसोबत रोज संवाद होत असतो. त्यामुळे तिच्यात बोलणे, वस्तू ओळखणे, संवाद साधने या गुणांचा विकास झाला. अवघ्या नऊ महिन्याची असताना ती आपल्या आजोबांसोबत वृत्तपत्रातले चित्र बघायला शिकली. त्यानंतर घरच्यांना तिला या गोष्टीत आवड आहे हे लक्षात आले.


श्रीनंदा देशकर हिने मराठी आणि इंग्रजीमध्ये 156 वस्तूंची नावे, दृश्‍य आणि तोंडी ओळखून दाखवत 'प्रशंसा श्रेणी' अंतर्गत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड (IBR) मध्ये प्रवेश मिळवला, तिची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने दखल घेतली. 16 महिन्याची असताना तीला हे सगळे येत होते. मात्र इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी जायला 18 महिने वयोमर्यादा पूर्ण करणे बंदनकारक होते. त्यामुळे श्रीनंदाच्या आई-वडिलांना यासाठी दोन महिने वाट बघावी लागली. 


श्रीनंदा ने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी काय-काय ओळखले? 
 
घरगुती वस्तू (44), प्राणी आणि पक्षी (31), खाद्यपदार्थ (23), शरीरराचे अवयव  (12), हिंदू देवता (12), फळे (11), भावना आणि भावना (9), भाज्या (8) आणि वाहने (6) या सर्व वस्तुंची बिनचूक ओळख श्रीनंदाने केली. 


श्रीनंदांची बुद्धिमत्ता, तिची आवड आणि आई-वडिलांचे परिश्रम हे या सगळ्याला जबाबदार आहेत. मात्र संयुक्त कुटुंब पद्धतीने  मुलांच्या कौशल्य विकासाला हातभार लागतो  हे श्रीनंदाच्या कौशल्य  विकासातून दिसून येते.


ही बातमी वाचा: