नागपूरः आज अकरावी प्रवेशाची (Maharashtra FYJC Merit List ) पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या पहिल्या गुणवत्ता याजीत 17 हजार 457 विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्य क्रमानुसार महाविद्यालय मिळाल आहे. महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना सहा ऑगस्ट सायंकाळी सहा पर्यंत आपलं प्रवेश निश्चित करावा लागेल. त्यानंतर दुसऱ्या यादीची घोषणा शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांनी दिली.
विविध प्रवर्गातील एकूण 40 हजार 168 जागा नागपूर विभागात उपलब्ध आहेत. त्यापैकी 23 हजार 628 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे. तर 17 हजार 457 विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्राधान्यक्रमानुसार प्रवेशासाठी संधी मिळाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज मिळाले आहेत त्या विद्यार्थ्यांना कॉलेज निश्चित करण्यासाठी सहा ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.
Cabinet Decision Maharashtra : जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50, मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे 10 निर्णय, जाणून घ्या सविस्तर
प्राधान्यक्रमानुसार महाविद्यालय मिळविलेले विद्यार्थी
अर्ज करताना प्राधान्यक्रमानुसार किमान एक तर 10 प्राधान्यक्रमानुसार महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांना करता येते. त्यानुसार पहिल्या प्राधान्यक्रमात 13 हजार 742 विद्यार्थी, दुसरा प्राधान्यक्रम असलेले 1 हजार 947 विद्यार्थी, तिसरा प्राधान्यक्रम असणारे 819 विद्यार्थी, चौथा प्राधान्यक्रम असणारे 441 विद्यार्थी पाचवा प्राधान्यक्रम असणाऱ्या 235 विद्यार्थी, सहावा प्राधान्यक्रमानुसार 122 विद्यार्थी, सातवा प्राधान्यक्रम असणारे 70 विद्यार्थी, आठवा प्राधान्यक्रम असणारे 42 विद्यार्थी, नववा प्राधान्यक्रम असणारे 25 विद्यार्थी आणि दहावा प्राधान्यक्रम असणाऱ्या 14 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.
पुढील प्रवेश प्रक्रियेचा संभाव्य वेळापत्रक
* दुसरी प्रवेश फेरी 7 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान
* तिसरी प्रवेश फेरी 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान
* विशेष प्रवेश फेरी 26 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Maharashtra FYJC Merit List 2022 : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; नामवंत कॉलेजचा कट ऑफ नव्वदीपार
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI