मुंबई : आज अकरावी प्रवेशाची (Maharashtra FYJC Merit List ) पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या पहिल्या गुणवत्ता यादीत 1,39,651 (58.86 % ) विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहे. यंदाच्या वर्षी सुद्धा मुंबईतील नामांकित कॉलेजचा कट ऑफ नव्वदी पार पाहायला मिळतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेताना चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत 61,635 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. तर 21,690 विद्यार्थ्यांना दुसरा पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. 14,476 विद्यार्थ्यांना तिसरा पसंतीचे कॉलेज मिळाले आहे


शाखेनुसार आकडेवारी पाहिली तर विज्ञान (Science) शाखेत प्रवेश घेणाऱ्या 48, 456 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज मिळाले आहे. वाणिज्य (Commerce) शाखेत प्रवेश घेणाऱ्या 75,357 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज मिळाले आहे. कला (Arts)  शाखेत प्रवेश घेणाऱ्या 14,831 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज मिळाले आहे.


ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज मिळाले आहेत त्या विद्यार्थ्यांना कॉलेज निश्चित करण्यासाठी सहा ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.


पहिल्या गुणवत्ता यादीनंतर मुंबईतील नामांकित कॉलेजचे कट ऑफ लिस्ट



  • एच आर कॉलेज, चर्चगेट


कॉमर्स - 93 %



  • एन एम कॉलेज 


कॉमर्स -93.6%



  • सेंट झेवीयर्स कॉलेज


आर्टस् - 94.2 %

सायन्स -89.6%


  • रुईया कॉलेज


आर्टस् - 91.4 %

सायन्स -92.4%



  • मिठीबाई कॉलेज



आर्टस् - 87.6%

कॉमर्स--90.8%

सायन्स- 89%



  • पोदार कॉलेज


कॉमर्स -92.4%



  • के सी कॉलेज 


आर्टस् - 85.6%

कॉमर्स--90.8%

सायन्स-88.2%


  • जय हिंद कॉलेज 


आर्टस् - 90.2 %


कॉमर्स--91%

सायन्स-87.4%



  • रुपारेल कॉलेज 


आर्टस् - 85.4%


कॉमर्स--88.8%

सायन्स- 90.2 %


  • साठे कॉलेज


आर्टस् -77.8%


कॉमर्स--87.2%

सायन्स-87.8%


  • डहाणूकर कॉलेज


कॉमर्स--89.4%



  • वझे केळकर कॉलेज 



आर्टस् -85.8%

कॉमर्स--91.2%

सायन्स- 91.8%

 

 





 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI