Nagpur Violance Update : लोकांना चिथावणी देऊन हिंसाचार केल्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या फहीम खानने त्याच्या जामीनसाठी सत्र न्यायालयात वकिलामार्फत अर्ज दाखल केला आहे. त्याच्या विरोधातले सर्व आरोप खोटे आहे म्हणून त्याची जामिनावर मुक्तता करण्यात यावी, असे मत त्याने आपल्या जामीनासाठीच्या अर्जातून मांडले आहे. 


दरम्यान, आरोग्य विषयक कारणे सांगितल्यामुळे आधीच फहीम खान (Faheem Khan) याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नागपूर हिंसाचारचा प्रमुख आरोपी फहीम खानचे हात पाय आणि पाठ दुखत असल्याने त्याला  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. अशातच आता फहीम खानने त्याच्या जामीनसाठी सत्र न्यायालयात वकिलामार्फत धाव घेतली आहे.  


हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्री फडणवीस पहिल्यांदाच आज नागपुरात


अशातच आज(22 मार्च)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात दाखल होणार आहे. नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्री फडणवीस हे पहिल्यांदाच नागपुरात येत आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावलेल्या या बैठकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून  नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराचा आढावा घेतला जाणार आहे. सोबत हिंसाचारग्रस्त भागातील विद्यमान परिस्थितीची व उपायोजना संदर्भात मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याचे सांगितलं जातंय.


पोलीस कोठडीत घेण्यासंदर्भातला अधिकार राखीव


फहिम खान बद्दल मी सध्या काहीही सांगू शकत नाही. मात्र जेव्हा वेळ येईल, तेव्हा आम्ही त्याबद्दलची माहिती सांगू. सध्या फहीम खानला वैद्यकीय कारणावरून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. त्याने तब्येत बरी नसल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने त्याची वैद्यकीय चाचणी झाली. त्यावर उपचार झाले आणि आता त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. मात्र पुढे त्याला पुन्हा पोलीस कोठडीत घेण्यासंदर्भातला सरकारी पक्षाचा अधिकार राखीव ठेवला गेला असल्याची माहिती सरकारी वकील मेघा बुरंगे यांनी दिली.  


फहीम खानने हात-पाय, पाठ दुखून त्रास होत असल्याची तक्रार केली आहे. त्याने वैद्यकीय उपचाराची मागणी केली होती आणि त्यानुसार त्याला रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. मात्र अजूनही पुढे पोलीस कोठडीत घेण्याचा अधिकार राखीव आहे. सुरुवातीला 19 आरोपीना पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर दोघांना पीसीआर देण्यात आले. काल(21 मार्च) 17 जणांना न्यायालयासमोर उपस्थित केले होते, त्यांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.


हे ही वाचा