नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा 1 ऑगस्टपासून सुरू होत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्रातील बहुतांश परीक्षांच्या निकालाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत. विद्यापीठाने हिवाळी परीक्षा सम-विषम पद्धतीने झाल्या असून 'सम' सत्रांमधील अनुत्तीर्ण, माजी व बहिःशाल विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने महाविद्यालय स्वतरावर घेण्यात आली. तर 'विषय' सत्रांतच्या नियमित, अनुत्तीर्म, माजी आणि बहिषःल अशा सर्वच परीक्षा विद्यापीठ स्तरावर ऑनलाइन घेण्यात आल्या. या परीक्षांमध्येही प्रथम वर्ष वगळता इतर सर्व परीक्षा 'प्रोमार्क' कंपनीने ऑनलाइन स्वरूपात घेतल्या. यातील केवळ एक परीक्षा वगळता इतर सर्व परीक्षांचे सर्व निकालही वेळेत जाहीर करण्यात आले. मात्र, विद्यापीठाचे निकाल 45 दिवसांच्या आत लावण्याचे नियम असतानाही एमकेसीएलच्या अखत्यारित असणाऱ्या प्रथम वर्षाच्या जवळपास 100 ऑनलाइन परीक्षांचे निकाल चार महिन्यांपासून रखडले आहेत. त्यापैकी केवळ 38 निकालांची घोषणा अद्याप करण्यात आलेली आहे.
मात्र उर्वरित परीक्षांचे निकाल अद्याप लागलेले नाहीत. विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देत द्वितीय सत्रात प्रवेश केला. त्या विद्यार्थ्यांच्या या सत्राच्या परीक्षाही काही दिवसात सुरू होणार आहेत. त्यानंतरही निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तिसऱ्या सत्रातील प्रवेशाचे प्रश्न
तिसऱ्या सेमिस्टरसाठी प्रथम सेमिस्टरचा निकाल आवश्यक असतो. त्यामुळे पहिल्या सत्राचे निकाल लागले नसल्याने तिसऱ्या सत्रात या विद्यार्थ्यांना कसा प्रवेश मिळेल हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, पहिल्या सत्रात काही विशिष्ट विषयात विद्यार्ती अनुत्तीर्ण झाल्यास त्याला तिसऱ्या सत्रात प्रवेशासाठी पहिल्या सेमिस्टरमधील विषयात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तेव्हा या परीक्षा होत त्याचे निकाल वेळेत न लागल्यास विद्यार्थ्यांचे सत्र वाया जाण्याची शक्यताही निर्माण होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
GRSE Recruitment 2022 : GRSE मध्ये 50 पेक्षा जास्त पदांसाठी भरती, 'या' दिवसापूर्वी करा अर्ज
शिवसेनेच्या 53 आमदारांना विधिमंडळ सचिवांच्या नोटिसा; फक्त आदित्य ठाकरेंना नोटीस नाही!
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI