Aaditya Thackeray : महाविकास आघाडी सरकारनं पर्यावरणाला अधिक महत्व दिले होते. आमचं सरकार हे मुंबईची काळजी घेणारं सरकार होतं. आम्ही आरे कारशेडसाठी पर्यायी जागेचा पर्याय दिला होता. हे सरकार मुंबईचा द्वेष करणारं सरकार आहे, असं म्हणत शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा लगावला. शिंदे-फडणवीस सरकार हे स्थगिती सरकार ठरणार का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. सरकारनं चांगल्या प्रकल्पांना स्थगिती दिली असल्याचेही ते म्हणाले.
आरे कारशेडविरोधात मुंबईतील पर्यावरण प्रेमींनी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. आरेमध्ये आमच्या सरकारनं 808 एकर जंगल म्हणून घोषीत केलं होतं. हे करत असताना आदिवासी बांधवांचे हक्क तसेच ठेवले आहे. अंतर्गत रस्ते चांगले होतील यादृष्टीने आम्ही तिथे काम केलं आहे. कांजूर मार्गला मेट्रो शेड आणून आपण 8 ते 10 हजार कोटी रुपये वाचवू शकतो असेही ठाकरे म्हणाले. हे सरकारनं चांगल्या प्रलल्पांना स्थगिती दिली आहे.
आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका
आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका. पहिलाच निर्णय या सरकारनं मुंबईच्या विरोधात घेतला आहे. मुंबईचे भलं करण्याचा आपण विचार करत होतो, त्याच्या विरोधातील निर्णय या सरकारनं घेतल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईनं नेहमी शिवसेनेची साथ दिली आहे. सरकार चांगल काम करत होतं, तरी आमच्या पाठीत का खंजीर खुपसण्याचे काय कारण असेही ते म्हणाले. जी चांगली काम आहेत, त्याला अधिक गती देणं, त्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. सरकार बदलंल म्हणून प्रोजेक्टला स्थगिती देणं हे योग्य नसल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.
माझ्यावर एवढं प्रेम दखवण्याची गरज नाही
आदित्य ठाकरे यांना वगळून राहिलेल्या शिवसेनेच्या 53 आमदारांना विधीमंडळ सचिवालयाने नोटीस पाठवली आहे. व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, माझ्यावर एवढं प्रेम दखवण्याची गरज नाही. प्रेम असते तर त्यांनी पाठीत खंजीर खुपसला नसता असेही ठाकरे म्हणाले. हा न्यायप्रविष्ठ विषय आहे. न्यायालयात हा विषय येणार आहे. शिवसेनेवर लोकांचे असलेले प्रेम हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. या सरकारने चांगल्या प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. मी आरोप प्रत्यारोपात पडणार नाही असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Aarey Colony Special Report: 2.5 वर्षानंतर 'आरे'वरुन पुन्हा पेटलं, आरे वाचवा म्हणत सेनेसह आप मैदानात
- AAREY Car Shed Oppose Special Report: आरे कारशेडचा मुद्दा पुन्हा वादात ABP Majha