Nagpur News : पालकांच्या चिंतेत अधिक भर घालणारी बातमी समोर आली आहे. नागपुरात मेंदूज्वर सदृश्य संशयित आजाराने मृत बालकांचा अधिकृत आकडा आता 10 वर पोहोचला आहे. नागपूरच्या (Nagpur News) एका खाजगी रुग्णालयात मध्यप्रदेशातील परासिया येथील दोन वर्षी बालिकेचा शनिवारी (4 ऑक्टॉबर) मृत्यू झाल्यानंतर गेल्या 2 महिन्यातील मेंदूवर सदृश आजाराने मृत बालकांची संख्या 10 झाली आहे. 10 पैकी 5 मृत बालक (Nagpur Children Death News) महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील असून ते नागपुरात उपचारासाठी आले होते. तर उर्वरित 5 बालक मध्यप्रदेशातून नागपुरात उपचारासाठी आले होते.
दरम्यान, या बालकांच्या मृत्यूंचे गूढ अजून ही कायम आहे. कारण त्यांचे मृत्यू "ॲक्युट एन्सेफेलायटिस सिंड्रोम"मुळे झाल्याचे संशय असताना त्या संदर्भातील विविध टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे. दरम्यान, यापैकी काही बालकांचे नमुने 'एनआयव्ही' (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) ने घेतले असले तरी त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही, तो कधी येईल ते ही सध्या स्पष्ट नाही.
नागपूरच्या विविध रुग्णालयांत 14 रुग्ण दाखल (Children Death Reason Unknown)
एकीकडे गेल्या दोन महिन्यात 10 बालकांचे मृत्यू नेमके कोणत्या आजाराने झाले? याबाबत अजून संभ्रम कायम असताना, अजून ही नागपूरच्या विविध रुग्णालयांत 14 रुग्ण दाखल आहेत. मात्र त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे. तर बालकांच्या या आजारामुळे काही प्रश्नही आता निर्माण झालेले आहे.
Nagpur Mystery Death: 10 मुलांच्या मृत्यूचं गूढ कायम, NIV रिपोर्ट कधी येणार?
- 10 बालकांच्या मृत्यूचे नेमके कारण काय?
- विदर्भ आणि मध्यप्रदेशातील छिंदवाडा परिसरात संशयित ए इ एस या मेंदूज्वराचे (Acute Encephalitis Syndrome) रुग्ण सापडत आहे का?
- असे असताना एइएस जापानी एन्सेफेलायटिस आणि चांडीपुरा व्हायरस चे चाचणी अहवाल नकारार्थी? मग मृत्यूचे नेमके कारण काय?
- पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील (NIV) तपासणी अहवाल केव्हा येणार?
छिंदवाडा येथे स्थानिक खोकल्याच्या सिरप पुरवठ्याची चौकशी (Inquiry into local cough syrup supply in Chhindwaran)
मिळालेल्या माहितीनुसार, खोकल्याच्या सिरपचा नमुना चाचणीसाठी तामिळनाडूतील एका प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. चाचणी अहवालाच्या आधारे, कोल्ड्रिंक सिरपवर आता बंदी घालण्यात आली आहे. जबलपूर किरकोळ विक्रेता आणि छिंदवाडा येथील स्थानिक पुरवठादाराची चौकशी केली जात आहे. संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले आहे आणि राज्यभरातील संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या: