Jain Boarding House Land:  पुण्यातील जैन बोर्डिंगच्या (Jain Boarding House) जमिनीच्या व्यवहारावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याप्रकरणी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावर एकामागून एक आरोप केले जात आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)  हे मोहळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, याच मुद्दयावर मुरलीधर मोहोळ यांनी माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी फोनवरून संवाद साधल्याचे माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

Murlidhar Mohol Call to Raju Shetti : मुरलीधर मोहोळ अन् राजू शेट्टींमध्ये काय बोलणं झालं?

जैन बोर्डिंगमध्ये अनेक संघटना काम करतात त्यांची बैठक झाली. का (26 ऑक्टॉबर ) रात्री 10.30 वाजता मला मुरलीधर मोहोळ यांचा फोन आला आणि व्हॉट्सॲपवरून त्यांनी मला एक पत्र पाठवलं. या पत्रात विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग संस्थेला कळवले की, हा व्यवहार रद्द झाला आणि 230 करोड रुपये जे दिले होते ते पैसे आम्हाला परत मिळावे. पण आम्ही पूर्णपणे समाधानी नाही, 3.5 एकर जागेवर गोखले यांचे नाव आहे. ट्रस्टने पुढे आलं पाहिजे आणि हे नाव काढून पूर्ण व्यवहार रद्द केला पाहिजे. अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केल्याचे ते म्हणाले.

Raju Shetti : अमित शाह यांनी या प्रकरणी मुळापर्यंत जावं

दरम्यान, मी कोल्हापूरचा माणूस आहे. मी नूरा कुस्ती खेळतो, आम्ही जागेवरचा कब्जा सोडणार नाही. धर्मदाय आयुक्त यांनी या व्यवहारात लक्ष घालावे. मला माहिती नाही की आजची तारीख का निवडली. पण केंद्रीय मंत्री अमित शाह येत असतील तर त्यांनी नक्की ट्रस्टची चौकशी करावी, मित शाह यांनी या प्रकरणी मुळापर्यंत जावं आमची नाराजी प्रवृत्ती वर आहे. विद्यार्थी शिकायला पुण्यात येतात. जो पर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही आणि ही जागा जोपर्यंत त्यांना मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू राहील. असेही राजू शेट्टी म्हणाले.

Continues below advertisement

Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर आज जैन बोर्डिंगला भेट देणार 

शिवसेना नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर हे आज जैन बोर्डिंगला भेट देणार आहेत. यावेळी ते जैन मुनींचे आशीर्वाद घेणार आहेत. रवींद्र धंगेकर यांनी 27 ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यापूर्वीच बिल्डर विशाल गोखलेंकडून जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या