मुंबई : वंशाचा दिवा म्हणून काही जणांची आजही मुलालाची पसंती आहे. बारामतीत तिसरीही मुलगी झाली या कारणावरून आईने पोटच्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारामतीतील माळेगाव येथील रामनगरमध्ये ही घटना घडली आहे. दीपाली झगडे असं आईचं नाव आहे.


25 तारखेला दुपारी सव्वा महिन्याच्या बाळाला आईने पाळण्यात झोपवलं होतं आणि आई खाली झोपली होती. दुपारी आईला जाग आल्यानंतर बाळ पाळण्यात नव्हतं. बाळाची शोधा शोध केली. शेजारची महिला हात धुण्यासाठी पाण्याच्या टाकीचे झाकण उघडलं असता बाळ टाकीत आढळलं. बाळाला लागलीच रुग्णालयात दाखल केल परंतु रुग्णालयात जाण्याआधी बाळाचा मृत्यू झाला होता. मुलीची आजी मनीषा जाधव यांनी त्याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता.


या घटनेचा अधिक तपास केला असता. आज आईनेच आपल्या बाळाचा खून केल्याची कबुली दिली. दिपालीला आधी 2 मुली आहेत. तिसरा मुलगा व्हावा अशी दिपालीची इच्छा होती. परंतु तिसरीही मुलगीच झाली, त्यामुळे ती नाराज होती. त्या मुलीच्या बाळंतपनाचा खर्चही 70 ते 80 हजार झाला होता. त्यामुळे ती आधीपासूनच त्या मुलीचा राग राग करत होती. शेजारच्या बाईने तुला तिसरीही मुलगीच झाली का? असं विचारलं याचा राग आल्याने तिने हे कृत्य केल्याचं सांगितलं.


शेजारील महिलेचं बोलणं जिव्हारी लागल्याने दीपालीने दुपारी घरात कुणी नसल्याचा फायदा घेत सव्वा वर्षाच्या बाळाला पाण्याच्या टाकीत टाकलं. बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून तिने टाकीचे झाकण लावलं. त्यातच बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दिपाली झगडेवर कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून तिला माळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.