मुंबई : आरे जंगलातील कारशेडवरुन शिवसेना आणि भाजप आमने-सामने उभे ठाकण्याची चिन्हं आहेत. एकीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आरेमधील वृक्षतोडीचं समर्थन करत असताना, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मात्र वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात मैदानात उतरले आहेत. "आरेला हात लावला तर आम्ही सहन करणार नाही," असं आदित्य ठाकरे यांनी ठणकावलं.


आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत आरेमधील मुंबई मेट्रो 3 च्या कारशेडला विरोध केला. या भागात असलेलं वन्यजीवांचं अस्तित्त्व दाखवणारं एक प्रेझेंटशनही त्यांनी दिलं. मात्र मेट्रोला किंवा विकासकामांना विरोध नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

तसंच आरेमध्ये कारशेड सुचवणारे कोण होते? हा घोटाळा आहे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. शिवाय याबाब तज्ज्ञांनी दिलेले अहवाल रद्द करुन एमएमआरसीएल देशाचं पर्यावरण मंत्रालय का चालवत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

आदित्य ठाकरे म्हणाले की, "आम्ही सगळे मुंबईसाठी बसलेले आहोत. मेट्रो आम्हाला सगळ्यांना हवी आहे, पण ही जी काही दादागिरी चालू आहे, मनमानी सुरु आहे, सगळं काही आम्ही सहन केलं आहे, पण मुंबईत आरेला हात लावला तर आम्ही सहन करणार नाही."

"आम्ही फक्त विरोधासाठी विरोध करत नाही. पण मुंबईतून काहीतरी नष्ट होणार आहे आणि ते आम्हाला नको आहे. लोकांचा जो आवाज आहे तो सरकारने ऐकावा,  एमएमआरसीएलने ऐकावा. हा फक्त 2700 झाडांचा प्रश्न नाही तर त्यापेक्षा आणखी काहीतरी आहे. इथल्या जैवविविधता, प्रजाती, पक्ष, कीटक आणि तिथे असलेल्या सगळ्या गोष्टींचा आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या

आरेच्या कारशेडला विरोध करणाऱ्यांनो गैरसमजुती दूर करा : आयुक्त प्रविणसिंह परदेशी

आरेतील वृक्षतोडीविरोधाच्या आंदोलनात राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे सहभागी, भर पावसात मुंबईकर एकवटले

मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीचा निर्णय झाला असला तरी काम सुरु करण्याची परवानगी दिलेली नाही, पालिकेची हायकोर्टात माहिती

आरेसाठी 'राज'पुत्र आखाड्यात, अमित ठाकरेंचा 'सेव्ह आरे'चा संदेश देणारा व्हिडीओ व्हायरल

आरे मेट्रो कारशेडसाठी दोन हजार 238 झाडांवर कुऱ्हाड पडणारच, सत्तेत असूनही शिवसेना अपयशी