अपघाताच्या काही काळ आधीच दानिशने कारमधून इन्स्टाग्राम स्टोरी केली होती. भरधाव वेगात असलेली दानिशची कार उलटून अपघात झाला. यामध्ये त्याच्या कारचा चक्काचूर झाला. हा घातपाताचा कट असल्याचा आरोप करत दानिशच्या कुटुंबीयांनी चौकशीची मागणी केली आहे.
21 वर्षांचा दानिश यूट्यूब चॅनेलमुळे प्रसिद्धीस आला होता. लाईफस्टाईलवर आधारित त्याच्या चॅनेलला तीन लाखांपेक्षा अधिक सबस्क्राईबर्स होते. याशिवाय तो एका फॅशन ब्लॉगमधून मेक अप टिप्सही देत असे. दानिशच्या हेअरस्टाईलचेही अनेक चाहते होते.
दानिशची लोकप्रियता पाहून एमटीव्हीने त्याला 'एस ऑफ स्पेस' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं. दानिश सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असून इन्स्टाग्राम स्टोरी, टिकटॉक व्हिडिओ करण्यात तो आघाडीवर होता.