रविवारी नायगाव परिसरात श्रमसाफल्य इमारतीत साप आल्याचं माहित पडल्यावर तो धावत साप पकडण्यासाठी गेला. मात्र या कोब्राला पकडताना त्याने अवेझच्या हातावर चावा घेतला. तरीही न घाबरता त्याने सापाला एका गोणीत भरलं आणि गोणी पाठीवर घेऊन तो निघाला. जाताना त्या विषारी सापानं अवेझच्या पाठीवरही चावा घेतला. तरीही अवेझनं सापाला पकडून ठेवलं आणि परिसरातील छोट्या खाडीत टाकलं.
नंतर अवेझ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला. मात्र तोपर्यंत अवेझच्या शरीरात 90 टक्के विष पसरलं होतं. त्यातच उपचारही वेळेवर न मिळाल्यामुळे अखेर अवेझचा मृत्यू झाला.
नायगाव परिसरात राहणाऱ्या मोहम्मद अवेझ मिस्त्रीला वयाच्या 8 व्या वर्षापासून साप पकडण्याचा छंद होता. परिसरात कुठेही साप दिसला की त्याला पकडण्यासाठी अवेझला फोन येत असे. आजपर्यंत त्याने अनेक विषारी सापांना मोठ्या शिताफीने पकडून जंगलात सोडलं होतं. विशेष म्हणजे साप पकडण्यासाठी तो कोणतंही हत्यार वापरत नव्हता. अवेझला दोन महिन्यांपूर्वीही अशाचप्रकारे साप चावला होता. मात्र त्यातून तो बचावला होता. मात्र यावेळी त्याला नशिबाने साथ दिली नाही.
ज्याने आजवर अनेक सापांना जीवदान दिलं, त्याचं सापाने त्याचा जीव घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे मिस्त्री कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साप पकडण्यासाठी कोणतीच घाईगडबड करु नका, असा सल्लाही सर्पमित्रांनी दिला आहे.
VIDEO: