शिवसेनेसोबत युतीसाठी भाजपचं एक पाऊल पुढे?
एबीपी माझा वेब टीम | 28 Feb 2017 08:58 PM (IST)
मुंबई : शिवसेनेसोबत पुन्हा युती करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दिल्ली दौऱ्यात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंकडून करण्यात येणाऱ्या प्रमुख मागण्यांची पूर्तता करण्याला प्राधान्य दिलेलं दिसत आहे. पंतप्रधानांना भेटण्यासाठी दिल्लीत गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि अन्नपुरवठा मंत्र्यांची भेट घेतली. मुंबईतल्या कोस्टल रोडला महिनाभरात सीआरझेडची परवानगी मिळणार आहे. तर रायगडसह इतर शिवकालीन गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याची मुंजरी देखील फडणवीसांनी मिळवली.